महिलांकरिता कर्करोग तपासणी शिबिर
By admin | Published: April 11, 2017 02:14 AM2017-04-11T02:14:04+5:302017-04-11T02:14:04+5:30
महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवून, महिलांकरिता उत्तम काम केले जात असतानाच, २०१७-१८ या वर्षात नवी मुंबई महानगरपालिका
नवी मुंबई : महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध कल्याणकारी योजना राबवून, महिलांकरिता उत्तम काम केले जात असतानाच, २०१७-१८ या वर्षात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील महिलांसाठी कर्करोग अर्थात कॅन्सर तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.
जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका व इंडियन कॅन्सर सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने तुर्भे स्टोअर येथील नागरी आरोग्य केंद्रामध्ये प्रायोगिक तत्त्वावर कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. याठिकाणी ईएनटी स्पेशालिस्ट, स्त्रीरोग तज्ज्ञांमार्फत महिलांची प्राथमिक आरोग्य चाचणी करण्यात आली. त्या अंतर्गत ओरल कॅन्सर, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग याबाबत प्राथमिक चाचणी करण्यात आली. यामध्ये आढळून आलेल्या संशयित रु ग्ण महिलांची याविषयीची पुढील तपासणी करण्यात येणार आहे.
तुर्भे स्टोअर येथे संपन्न झालेल्या शिबिराच्या ठिकाणी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सायली शिंदे, समाजविकास विभागाच्या उपआयुक्त तृप्ती सांडभोर, वैद्यकीय अधिकारी डॉ. उज्ज्वला ओतुरकर आदी मान्यवर उपस्थित होते. महिलांच्या आरोग्य रक्षण, संवर्धनासाठी अशा उपक्र मांची नितांत आवश्यकता असल्याचे सांगत महिला व बालकल्याण समिती सभापती सायली शिंदे यांनी हा उपक्र म पूर्णत्वास नेण्यासाठी समिती सर्वोतोपरी काम करेल, असा विश्वास देत या उपक्रमाचा महिलांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन केले.