रोहा बाजारपेठेत कारने १० जणांना उडविले
By admin | Published: February 6, 2017 04:47 AM2017-02-06T04:47:28+5:302017-02-06T04:47:28+5:30
रोह्यात नागोठणेकडून कार चोरून नेत असताना चालकाने रोह्यातील बाजारपेठेत मोटरसायकलसह १० पादचाऱ्यांना उडविले.
धाटाव : रोह्यात नागोठणेकडून कार चोरून नेत असताना चालकाने रोह्यातील बाजारपेठेत मोटरसायकलसह १० पादचाऱ्यांना उडविले. या भयानक अपघातात सर्वांनाच गंभीर दुखापत झाल्यामुळे संतप्त जमावाने या कार चालकाला चोप दिला. चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्या विरोधात रोहा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेमुळे सबंध रोह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
शनिवारी ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७.२५ च्या सुमारास कमलेश गंगू प्रजापती(२३,रा.जैनबस्ती, जि. उदयपूर, राजस्थान) हा एम.एच.४६ए.डी.२५८२ क्र मांकाची कार चोरी करून नागोठणे,भिसे खिंडीमार्गे रोह्याकडे येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिसांनी थांबविण्याचा इशारा केला. मात्र याकडे दुर्लक्ष करून तो कार भर बाजारातून अधिक भरधाव वेगाने रस्त्यावरील रहदारीकडेही दुर्लक्ष करीत जात होता.
यावेळी फिर्यादी अमोल तुकाराम घाडगे (३५) यांच्या मोटारसायकलला ठोकर मारून व रस्त्यावरील इतर मोटारसायकल व १० पादचाऱ्यांना जोरदार धडक देत दुखापत के ली. अपघातातील जखमींमध्ये भूषण दिलीप म्हात्रे, प्रसाद रामचंद्र मेकडे (रा. भुवनेश्वर,रोहा), अंजना नरेश मोरे, सतीश गोविंद देशमुख (रा. विष्णूनगर), रश्मी राजेश वाघमारे (रा. परमारनगर-रोहा), विजय शांताराम कासार, ओम राजेंद्र कासार (७),साईशा राजेंद्र कासार (२, रा.खारापटी), ज्ञानेश्वर मारु ती सानप (गावठाण), चौहान व स्वत: आरोपी कमलेश प्रजापती सुद्धा जखमी झाला आहे. जखमींवर रोह्यातील उपजिल्हा रु ग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची रोहा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून रोह्याच्या पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार म्हात्रे व सहकारी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)