शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

गावांविषयी सावध भूमिका

By admin | Published: July 21, 2015 4:16 AM

ठाणे व कल्याण परिसरातील १४ गावे पुन्हा सहभागी करून घेण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सावध भूमिका घेतली आहे. हा परिसर पालिकेत

नवी मुंबई : ठाणे व कल्याण परिसरातील १४ गावे पुन्हा सहभागी करून घेण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने सावध भूमिका घेतली आहे. हा परिसर पालिकेत सहभागी करून देण्यापूर्वी अतिक्रमणे हटवावीत, भौगोलिक समानता येण्यासाठी भुयारी मार्ग तयार करून द्यावा व विकासासाठी सरकारने ५०० कोटी रुपये द्यावे अशी मागणीही करण्यात आली आहे.नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना झाल्यानंतर सिडको क्षेत्रातील १९ व एमएमआरडीए क्षेत्रातील ठाणे व कल्याण परिसरातील १५ गावांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. १५ पैकी १४ गावांनी नेहमीच महापालिकेस विरोध केला. निवडणुकांवरही बहिष्कार टाकला होता. एका नगरसेवकाची हत्या झाली असून काही लोकप्रतिनिधींची घरे जाळण्यात आली होती. १४ गाव संघर्ष समितीने गावे पालिकेतून वगळण्यासाठी आंदोलन सुरू केले. अखेर ८ जून २००७ मध्ये ही गावे पालिकेच्या हद्दीतून वगळण्यात आली. आता ८ वर्षांनंतर पुन्हा ही गावे महापालिकेमध्ये समाविष्ट करून घेण्याविषयी हालचाली सुरू झाल्या आहेत. याविषयी पालिकेच्या सर्वसाधारण सभेतही पडसाद उमटले आहेत. नगरसेवक रमेश डोळे यांनी या गावांना सहभागी करून घ्यावे. तेथील ग्रामसभेचेही तसे मत असल्याचा ठराव मांडला होता. या विषयावर मत व्यक्त करताना काही नगरसेवकांनी १४ गावे त्वरित सहभागी करून घ्यावीत. त्यामुळे पालिकेची हद्द वाढेल. तेथील जमीन महापालिकेस मिळून महसूल वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली. घाईगडबडीत निर्णय घेण्यापूर्वी ग्रामस्थांची मते जाणून घ्यावीत, असेही मत नगरसेवकांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँगे्रसच्या नगरसेवकांनी चौदा गावांविषयी पूर्णपणे सावध भूमिका घेतली आहे. पालिकेच्या स्थापनेनंतर ही गावे महापालिकेत आली. त्या ठिकाणी जवळपास ७८ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला. परंतु रहिवाशांच्या विरोधामुळे तो भाग पालिकेतून वगळावा लागला. आता पुन्हा ही गावे नवी मुंबईकडे द्यायची असल्यास सरकारने पालिकेला मदत करावी. मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. सर्व अतिक्रमणे सर्वप्रथम हटवण्यात यावीत. नवी मुंबई व परिसराला भौगोलिकदृष्ट्या एकत्र आणण्यासाठी डोंगर पोखरून भुयारी मार्ग तयार करण्यात यावा. या परिसरातील प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी किमान ५०० कोटी रुपये महापालिकेस मिळावे अशी मागणीही करण्यात आली. घाईगडबडीने व पुन्हा महापालिकेस त्रास होईल असा निर्णय घेण्यात येवू नये, अशी भूमिकाही काही नगरसेवकांनी व्यक्त केली.