उरण : जेएनपीटी समुद्र चॅनेलमध्ये सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास दोन जहाजांची टक्कर थोडक्यात टळली. परस्पर विरुद्ध दिशेने जाणारी मालवाहू जहाजे एकमेकाला घासली गेली, मात्र सुदैवाने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. या घटनेची चौकशी करण्यात येत असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.सोमवारी रात्री एम. बी. ई.एच. चिनुक हे जहाज जेएनपीटी बंदरातून निघाले होते, तर हुंडाई कंपनीचे करजे हे मालवाहू जहाज जेएनपीटी बंदरात निघाले होते. जेएनपीटी समुद्र चॅनेलमधून जाणाºया व येणाºया जहाजांवरील कॅप्टनच्या चुकीमुळे दोन्ही जहाजांची टक्कर होणार होती. मात्र, दोन्ही जहाजांवरील नाविकांनी जहाजांवर ताबा मिळविण्यात यश मिळविल्याने जहाजे परस्परांना घासून पास झाली, अन्यथा अपघात होऊन मोठा अनर्थ घडला असता. या घटनेची एमबीपीटी आणि जेएनपीटी प्रशासनाने दखल घेतली असून, चौकशी सुरू करण्यात आल्याची माहिती जेएनपीटीच्या अधिकृत सूत्रांनी दिली. याप्रकरणी जेएनपीटीचे हार्बर मास्टर कॅप्टन सुनील निषीध यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही, तर डीजी शिपिंगच्या अधिकाºयांनीही घटनेची पुष्टी करीत चौकशी सुरू असल्याचे सांगितले.जेएनपीटीकडे जाणाºया व येणाºया जहाजांवरील कॅप्टनच्या चुकीमुळे दोन्ही जहाजांची टक्कर होणार होती.
मालवाहू जहाजांची टक्कर टळली, चौकशीचे आदेश : जेएनपीटी समुद्र चॅनेलमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 2:31 AM