नवी मुंबई : मंत्रालयात उपसचिव पदावर कार्यरत असलेले आयएएस अधिकारी अमन मित्तल व त्यांचा भाऊ देवेश मित्तल यांच्यावर इंटरनेट सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना घरात डांबून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घणसोलीतील घरामध्ये बसवलेले इंटरनेट सुरू झाले नसल्याच्या कारणातून हा प्रकार घडला आहे. दरम्यान, मित्तल यांनीही संबंधित दोघांविरोधात मारहाणीची तक्रार केली आहे. यामुळे रबाले पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीच्या आधारे तपास सुरू केला आहे.
अमन मित्तल यांचा भाऊ देवेश मित्तल यांच्या घरामध्ये एअरटेल कंपनीचे इंटरनेट बसवले होते. ते सुरू न झाल्याची तक्रार अमन मित्तल यांनी कंपनीकडे केली होती. त्यावरून सागर मांढरे, भूषण गुजर हे त्याठिकाणी पाहणीसाठी गेले. त्यांच्याकडून समाधानकार उत्तर न मिळाल्याने मारहाण केल्याचा आरोप आहे.
मित्तल यांचा आरोपदरम्यान, या दोघांनी वाद घालून आपल्यालाही मारहाण केल्याचा आरोप अमन मित्तल यांनी केला आहे. त्यानुसार दोघांच्या तक्रारीवरून रबाळे पोलिस ठाण्यात एकमेकांविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरूया घटनेत सागर मांढरे यांना गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले. याप्रकरणी रबाळे पोलिस अधिक तपास करत असून, त्यासाठी सोसायटी परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात आहेत.