नवी मुंबईमधील १२९ वीजचोरांवर गुन्हे दाखल
By नामदेव मोरे | Published: January 3, 2024 08:16 PM2024-01-03T20:16:38+5:302024-01-03T20:16:58+5:30
घणसोलीमधील प्रकार : १७५ प्रकरणात ९० लाख रुपयांची वीजचोरी उघड.
नवी मुंबई : घणसोलीमध्ये वीजगळती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे निदर्शनास आले होते. महावितरण अधिकाऱ्यांनी वीजचोरीविरोधात विशेष मोहीम राबविली. १७५ प्रकरणांमध्ये ९० लाख रुपयांची वीजचोरी उघड झाली आहे. या प्रकरणी १२९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
वीजचोरीला आळा घालण्यासाठी भांडूप परिमंडळचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी मोहीम राबविण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या होत्या. वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी वाशी व नेरूळ विभागाच्या माध्यमातून संयुक्त मोहीम राबविली होती. कलम १३५ अंतर्गत १४६ प्रकरणे उघडकीस आणली असून ७७ लाख रुपयांची वीजचोरी केल्याचे निदर्शनास आले. कलम १२६ अंतर्गत २६ प्रकरणे उघकीस आणली असून १२ लाख ९५ हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. ग्राहकांनी प्रथमीच वीजचोरी केली असल्यास कायद्याने सदर गुन्हा कंपाऊंडींग करण्याची सोय आहे. वीजचोरीचे बील व कंपाऊंडींग रक्कम न भरलेल्या ग्राहकावर वीजकायदा २००३ कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करता येतो. घणसोलीमध्ये उघडकीस आलेल्या १४६ प्रकरणांपैकी १२९ ग्राहकांनी वीजचोरचे बील व कंपाऊंडींग भरलेले नसल्यामुळै घणसोली शाशेचे सहाय्यक अभियंता सुनिल सरोदे यांनी वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. या कामी त्यांना अतीरिक्त अभियंता गोफणे, वरिष्ठ तंत्रज्ञ अश्विनी शेवाळे, राखी चौगुले, निलेश कराळे यांनी सहकार्य केले.
अधrक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमध्ये वाशी, ऐरोलीचे कार्यकारी अभियंता, अतीरिक्त कार्यकारी अभियंता यांच्यासह सहायक अभियंता सुनिल सरोदे, सर्व टीमचे भांडूप परिमंडळचे मुख्य अभियंता सुनिल काकडे यांनी अभिनंदन केले आहे. यापुढेही वीजचोरांविरोधात कारवाई सुरू ठेवली जाणार असल्याचे महावितरण प्रशासनाने स्पष्ट केले आहे.