शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
4
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
5
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
6
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
7
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
8
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
9
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
10
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
11
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
12
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
13
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
14
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
15
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
16
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
17
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
18
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
19
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान

पनवेलमधील कॅशलेस गावे कागदावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:24 AM

केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया मोहिमेचा भाग म्हणून रायगड जिल्हाधिकाºयांनी ६७ गावे कॅशलेस करण्याची घोषणा केली होती.

नामदेव मोरेनवी मुंबई : केंद्र शासनाच्या डिजिटल इंडिया मोहिमेचा भाग म्हणून रायगड जिल्हाधिकाºयांनी ६७ गावे कॅशलेस करण्याची घोषणा केली होती. यामध्ये पनवेल तालुक्यातील कोप्रोली व डेरीवली या दोन गावांचा समावेश होता. परंतु एक वर्षानंतरही फक्त औपचारिक बैठक वगळता गावे कॅशलेस करण्यासाठी काहीही प्रयत्न झालेले नसून, डिजिटल इंडिया मोहीम फसल्याचे उघड झाले आहे.डिजिटल इंडिया अभियानाचा भाग म्हणून केंद्र शासनाने जास्तीत जास्त कॅशलेस व्यवहार करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. हे अभियान गावापर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्रातील गावे कॅशलेस करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. १६ डिसेंबर २०१६ रोजी रायगड जिल्हाधिकारी शीतल तेली- उगले यांनी अधिकाºयांची बैठक घेवून जिल्ह्यातील ६७ गावे कॅशलेस करण्याचा निर्धार व्यक्त केला होता. पहिल्या टप्प्यात प्रत्येक तालुक्यातून दोन गावांची निवड केली होती. यामध्ये पनवेल तालुक्यातील कोप्रोली व डेरीवली या दोन गावांची निवड केली होती. तहसीलदार दीपक आकडे यांनी दोन्ही गावांमध्ये बैठका घेवून राज्यातील पहिले डिजिटल गाव बनविण्याचा संकल्प सोडला होता. याविषयी प्रसारमाध्यमांमध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. परंतु पुढील एक वर्षामध्ये काहीही प्रयत्न झालेले नाहीत. ‘लोकमत’च्या टीमने कोप्रोलीला भेट दिली असता कॅशलेस गाव करण्यासाठी प्रशासनाने काहीही केले नसल्याची माहिती समोर आली. गावामध्ये छोटी-मोठी २० दुकाने आहेत. या दुकानांमध्ये जावून चौकशी केली असता सर्व व्यवहार रोकडमध्येच होत असल्याचे त्यांनी सांगितले. कॅशलेस व्यवहार करण्यासाठी वर्षभरामध्ये काहीही प्रयत्न झालेले नाहीत व प्रत्यक्षात ते शक्यही नसल्याची माहिती देण्यात आली. प्रशासनाने फक्त दिखावेगिरी केली असल्याचेही उघड झाले आहे. येथील नागरिकांशी कॅशलेसविषयी चर्चा केली असता एक वर्षापूर्वी एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये काय केले जाणार याविषयी माहिती दिली, पण प्रत्यक्षात काहीही झाले नसल्याचे सांगण्यात आले.मुंबई-पुणे रोडवर पनवेलपासून काही अंतरावर असलेल्या डेरीवली गावाचीही कॅशलेससाठी निवड झाली होती. या गावालाही ‘लोकमत’च्या टीमने भेट दिली. गावाच्या मध्यभागी असलेल्या दुकानामध्ये काही साहित्य घेवून कार्डने पैसे दिले तर चालतील का असे विचारले असता आमच्याकडे स्वाइप मशिन नाही, असे सांगण्यात आले. शासनाच्या कॅशलेस व्हिलेजविषयी सांगितले असता त्यांना काहीही माहिती नसल्याचे दुकानदारांनी सांगितले. गावातील इतर दुकानदारांनीही येथील सर्व व्यवहार कॅशमध्येच होत असल्याची माहिती दिली. कॅशलेस अभियान राबविण्यासाठी गावच्या शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांचा जनजागृतीसाठी उपयोग केला जाणार होता. परंतु शाळेत जावून चौकशी केली असता याविषयी काहीही माहिती नसल्याचे शिक्षकांनी सांगितले. डिजिटल इंडिया अभियान पूर्णपणे फसले असून शासन व प्रशासनाच्या दिखावेगिरीविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.डिजिटल व्हिलेज ही काही दिवसामध्ये किंवा महिन्यामध्ये साध्य होणारे अभियान नाही. यामुळे प्रशासनाने या भ्रामक कल्पनांपेक्षा गावातील रस्ते, गटार, शाळा व इतर नागरी सुविधा दर्जेदार कशा देता येतील याकडे लक्ष द्यावे. नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाल्या, त्यांचा आर्थिक स्थर सुधारला तरच कॅशलेस व्हिलेज प्रत्यक्षात अस्तित्वात येईल असे मतही काही ग्रामस्थांनी चर्चा करताना व्यक्त केले.दुकानदारांनामाहितीच नाहीगावे कॅशलेस करण्यासाठी दुकानदारांची भूमिका महत्त्वाची आहे. दुकानदारांना या अभियानाविषयी सविस्तर माहिती देणे व त्यांच्याकडे स्वाइप मशिनपासून इतर सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे होत्या. पण प्रत्यक्षात या मोहिमेविषयी कोणत्याही व्यापाºयाला माहिती नसल्याचेच त्यांच्याशी चर्चा करताना लक्षात आले.कॅशलेससाठीचे पाच मार्गजिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी डिजिटल इंडिया अभियानाअंतर्गत कॅशलेस गावे करताना पाच मार्गांचा वापर करण्याचे पर्याय असल्याचे स्पष्ट केले होते. यामध्ये यूपीआय, यूएसएसडी, ई-वॅलेट, डेबिट व क्रेडिट कार्ड, आधार संलग्न पेमेंट पद्धतीचा समावेश होता. यामधील एकाही पद्धतीचा दोन्ही गावातील नागरिकांकडून वापर होत नाही व तो व्हावा यासाठी प्रशासनाने काहीही प्रयत्न केलेला नाही.

टॅग्स :Note Banनोटाबंदी