सर्व सण उत्सव धुमधडाक्यात साजरे करा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन
By नामदेव मोरे | Published: October 23, 2023 12:12 PM2023-10-23T12:12:45+5:302023-10-23T12:15:25+5:30
दिवाळीसह सर्व सणही धुमधडाक्यात साजरे करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
नवी मुंबई: राज्यात व देशात जनतेच्या मनातील ऐकून निर्णय घेणारे सरकार कार्यरत आहे. दहिहंडी, गणपती उत्साहात साजरी झाली. नवरात्रीत १२ वाजेपर्यंत दांडीयासाठी वेळ वाढवून दिला. दिवाळीसह सर्व सणही धुमधडाक्यात साजरे करा असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
नवी मुंबईत सुनील चौगुले स्पोर्ट्स क्लब च्या वतीने आयोजीत नवरात्र व दांडीया उत्सवास मुख्यमंत्र्यांनी भेट दिली. यावेळेस उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना जय शिवराय, जय श्रीराम चा जयघोष केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य राममंदिर बांधले जात आहे. जानेवारीत राममंदिर सर्वांसाठी खुले होणार आहे. आपले स्वप्न साकार होणार असेही सांगितले. राज्यात सरकार आल्यानंतर कोरोना चे संकट दूर झाले. सण उत्सवांवरील निर्बंध बंद झाले. आपले सण, उत्सव, परंपरा जपण्याचे आवाहन ही यावेळेस मुख्यमंत्र्यांनी केले.
यावेळेस आयोजक व नवी मुंबई शिवसेना जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले. कार्यक्रमास माजी नगरसेवक ममीत चौगुले व इतर पदाधिकारी उपस्थित होते.