शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
2
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
3
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
4
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
5
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
6
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
7
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
8
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
9
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
10
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
11
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
12
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
13
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
14
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
15
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?
16
जास्तीत जास्त मुले जन्माला घाला, अन्यथा..; CM चंद्रबाबू नायडूंचे आवाहन, कारण काय?
17
महाराष्ट्रात हरयाणामध्ये झालेल्या त्या चुका काँग्रेस टाळणार, राहुल गांधी घेताहेत अशी खबरदारी
18
शेलार बंधू विधानसभेच्या रिंगणात; आशिष शेलारांसह त्यांच्या मोठ्या भावालाही भाजपची उमेदवारी
19
दिल्लीतील प्रदूषणाला उत्तर प्रदेश आणि हरयाणा सरकारवर जबाबदार; CM आतिशी यांचा आरोप
20
Ranji Rrophy: रिंकूची चौकार-षटकारांची 'बरसात'; बॅटिंगमध्ये Yuzvendra Chahal ही ठरला 'फर्स्ट क्लास'

सिडकोच्या सागरी मार्गाला केंद्राचा हिरवा कंदील

By नारायण जाधव | Published: October 17, 2023 7:08 PM

३,७२८ खारफुटीच्या कत्तलीसह ३२.६९ हेक्टर राखीव वनजमीन होणार बाधित

नवी मुंबई : सी लिंक अर्थात शिवडी-न्हावा शेवा सागरी सेतूपासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला थेट जोडणाऱ्या सात किलोमीटर लांबीच्या नव्या सागरी सेतूला केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाने अखेर परवानगी दिल्याने सिडकोला मोठा दिलासा मिळाला आहे. ६८१ कोटी ६३ लाख रुपये खर्च प्रस्तावित केलेल्या या मार्गासाठी ३,७२८ खारफुटींची कत्तल करावी लागणार असून त्यासाठी रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील न्हावे येथील ३२.६९ हेक्टर राखीव वनजमीन वळती केली आहे.

गेल्या महिन्यात महाराष्ट्र सागर किनारा प्राधिकरणाने हिरवा कंदील देऊन या सागरी मार्गाचा प्रस्ताव पुढील मान्यतेसाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला होता. त्यास अटी व शर्थींवर पर्यावरण मंत्रालयाने मंजुरी दिल्याने या मार्गातील बहुतांश अडथळे आता दूर झाले आहेत.सात किमीचा आहे रस्ता प्रस्तावित सागरी मार्ग सी लिंक जंक्शनपासून आम्र मार्ग जंक्शनपर्यंत बांधण्यात येणार असून, त्याची लांबी ७ किमी इतकी आहे. यात मूळ रस्ता ५.८ किमी असून, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी मार्गिका १.२ किमी आहे.

नवी मुंबई विमानतळ मुंबईच्या आणखी नजीकदक्षिण मुंबईला थेट नवी मुंबईशी जोडणाऱ्या न्हावा शेवा सी लिंक या २२ किमी लांबीच्या सागरी सेतूमुळे मुंबई ते नवी मुंबई हे तासाचे अंतर २० मिनिटांवर येणार आहे. नवी मुुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे येण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याची एक मार्गिका उलवे जवळच्या शिवाजीनगर येथे तर दुसरी मार्गिका चिर्ले जंक्शजवळ उतरवली आहे. शिवाजीनगर मार्गिकेवरून विमानतळाकडे जाण्यासाठी सिडकोने हा सात किलोमीटरचा सागरी किनारा मार्ग बांधण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे राजधानी मुंबई ही नवी मुुंबई विमानतळाच्या आणखी जवळ येणार आहे.

नवी मुंबईकरांनाही होणार लाभप्रस्तावित मार्गाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना वाहतुकीचा नवा मार्ग उपलब्ध होणार आहे. सध्याच्या पाम बीचरोड, आम्र मार्ग, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३४८ वरील वाहतुकीचा भार कमी होऊन सुरळीत प्रवास करणे शक्य होणार आहे. या मार्गावरून विमानतळाच्या दिशेने डाव्या बाजूला नवी मुंबईच्या दिशेने जाण्यासाठीही मार्गिका असणार आहे. यामुळे शिवडी-न्हावाशेवा सागरी मार्गावरून बेलापूर, नेरूळ, सीवूड, सानपाडातील प्रवाशांनाही तो सोयीचा ठरणार आहे. तसेच नवी मुंबई विमानतळ, नवी मुंबई सेझसाठी तो फायद्याचा ठरणार आहे.

तीन ठिकाणी उड्डाणपूलया सात किमीच्या सागरी मार्गाच्या बांधकामात मार्गात तीन ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात येणार आहेत. याशिवाय एक मोठा, तर छोटा पूल, ६ कल्व्हर्ट बांधण्यात येणार आहे. मार्गात पिलरच्या बांधकामासाठी ५.५७ हेक्टर जमीन कायमची जाणार आहे. यात मोठ्याप्रमाणात खारफुटीसह झाडांचीही कत्तल करावी लागणार आहे.

जळगाव जिल्ह्यात पर्यायी वृक्षलागवडमार्गाच्या कामासाठी ३,७२८ खारफुटींची कत्तल करावी लागणार असून, त्यासाठी रायगड जिल्ह्याच्या पनवेल तालुक्यातील न्हावे येथील ३२.६९ हेक्टर राखीव वनजमीन वळती केली आहे. या नुकसानीच्या बदल्यात शेवरे खुर्द, ता. पारोळा, जिल्हा जळगाव येथे देशी प्रजातीच्या वृक्षांची लागवड करावी लागणार आहे.

पक्षी निरीक्षणाची सक्तीप्रस्तावित सागरी मार्ग हा फ्लेमिंगो पक्ष्याच्या अधिवास क्षेत्रातून जातो. यामुळे त्याचे बांधकाम सुरू असताना आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतरही किमान दोन वर्षांपर्यंत त्याच्यामुळे फ्लेमिंगो पक्षांसह समुद्री पक्षी आणि वन्य प्राण्यांच्या जीवनमानावर काय बरेवाईट परिणाम झाले याचे निरीक्षण मुंबई विद्यापीठाच्या झुनझुनवाला महाविद्यालयांसारख्या प्रतिष्ठित महाविद्यालयाकडून करून त्याचा अहवाल पाठवावा, अशी सूचना वने आणि पर्यावरण मंत्रालयाने केली आहे.

मच्छीमारांवर परिणाम नकोप्रस्तावित सागरी मार्गाच्या बांधकामामुळे मच्छीमारांचे येण्या-जाण्याच्या मार्ग, खाडी प्रदूषण होऊन त्यांच्या परिणाम व्हायला नको, याची दक्षता घेण्यास सांगितले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCentral Governmentकेंद्र सरकार