सानपाडा विभागात उभी राहतेय सेंट्रल लायब्ररी, आ. मंदा म्हात्रेंनी घेतला कामाचा आढावा

By योगेश पिंगळे | Published: September 14, 2023 04:56 PM2023-09-14T16:56:20+5:302023-09-14T16:56:20+5:30

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तसेच पुस्तक वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी सानपाडा विभागात सेंट्रल ...

Central Library is standing in Sanpada Division, Manda Mhatre reviewed the work | सानपाडा विभागात उभी राहतेय सेंट्रल लायब्ररी, आ. मंदा म्हात्रेंनी घेतला कामाचा आढावा

सानपाडा विभागात उभी राहतेय सेंट्रल लायब्ररी, आ. मंदा म्हात्रेंनी घेतला कामाचा आढावा

googlenewsNext

योगेश पिंगळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: शहरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी तसेच पुस्तक वाचनाची आवड असणाऱ्यांसाठी सानपाडा विभागात सेंट्रल लायब्ररी सुरू करण्याची मागणी नागरिकांच्या माध्यमातून करण्यात येत होती. आमदार मंदा म्हात्रे यांनी सदर हा प्रश्न मार्गी लावला असून "सेंट्रल लायब्ररीच्या" इमारतीचे काम महापालिकेच्या माध्यमातून सुरु झाले आहे. या कामाचा आमदार म्हात्रे यांनी आढावा घेतला.

सानपाडा विभागात “सेंट्रल लायब्ररी” सारखी वास्तू होणे गरजेचे होते. या इमारतीचे काम सुरु झाले असून या कामाचा आढावा दौऱ्याच्या अनुषंगाने घेण्यात आल्याचे आमदार म्हात्रे यांनी सांगितले. प्रत्येक विकास कामांवर माझ लक्ष असून त्याचा आढावा घेत असते. बेलापूर मतदार संघात सर्वात जास्त कामे सुरु असून असल्याचे आमदार म्हात्रे यांनी सांगितले. या परिसरातील काही नागरिकांना उद्यान, खेळाचे मैदान अशा विविध समस्या असून महापालिकेचे आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याकडे मांडून ते लवकरात लवकर सोडविणार असल्याचे म्हात्रे यांनी यावेळी सांगितले.

यावेळी महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय पाटील, उपअभियंता विवेक मुलीये, कनिष्ठ अभियंता अविनाश यादव, समवेत समाजसेवक पांडुरंग आमले, जगन्नाथ जगताप, निलेश वर्पे, चिंतामण बेल्हेकर, रुपेश मढवी, अशोक विधाते, नाना शिंदे, मारुती माने, जयराम खरात, श्रीपाद पत्की, दिशा केणी, स्वाती कदम, सुलोचना निंबाळकर, विश्वास बोराडे, पोपट गोडे, मंदार शेलार आदी नागरिक व कार्यकर्ते  उपस्थित होते.

अशी असेल लायब्ररीची रचना

सानपाडा येथील भूखंड क्रमांक १, सेक्टर - ११ येथील भूखंडावर “सेंट्रल लायब्ररी” ची वास्तू उभी राहणार आहे. सदर वास्तू ही बेसमेंट+तळमजला+ चार मजली असणार आहे. त्याचबरोबर या लायब्ररीमध्ये पुस्तकांप्रमाणेच आधुनिक काळाला साजेशा ऑडीओ बुक्स, ई-लायब्ररी संकल्पनेचा अंतर्भाव, पर्यावरणपूरक “ग्रीन बिल्डींग, रँम्पवर व्हयुइंग गॅलरीची आकर्षण रचना, पुस्तकाचा प्रवास दर्शविणारा लक्षवेधी प्रदर्शन, लँग्वेज लॅब तसेच ग्रंथ विषयक उपक्रमांकरिता १३० आसनक्षमतेचे अद्ययावत सभागृह, दृष्टीहीन वाचकांसाठी ब्रेल विभाग व मराठी, हिंदी, इंग्रजीसह विविध भाषांतील वाचनीय साहित्यकृती उपलब्धता या “सेंट्रल लायब्ररी” मध्ये मिळणार आहे.

Web Title: Central Library is standing in Sanpada Division, Manda Mhatre reviewed the work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.