मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक
By admin | Published: November 14, 2015 11:20 PM2015-11-14T23:20:32+5:302015-11-14T23:20:32+5:30
मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप जलदसह हार्बरच्या वाशी-बेलापूर स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक सकाळी ११ ते दु. ३.४० या वेळेत घेण्यात येणार आहेत.
डोंबिवली : मध्य रेल्वेच्या कल्याण-ठाणे अप जलदसह हार्बरच्या वाशी-बेलापूर स्थानकांदरम्यान रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हे ब्लॉक सकाळी ११ ते दु. ३.४० या वेळेत घेण्यात येणार आहेत.
या ब्लॉकमुळे मुख्य मार्गावरील कल्याण-ठाणे अप जलदची वाहतूक अप धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे या वेळेत अप धीम्यावर येणाऱ्या लोकल सर्व स्थानकांत थांबतील. या ब्लॉकमुळेच दादर-रत्नागिरी ही गाडी दिवा स्थानकातूनच सोडण्यात येणार असून रत्नागिरी-दादर ही पॅसेंजर दिवा स्थानकापर्यंतच धावेल, असेही म.रे.च्या जनसंपर्क विभागाने स्पष्ट केले आहे. हार्बरच्या वाशी-बेलापूर मार्गावर स. ११ ते दु. ३ या वेळेत ब्लॉक असल्याने या कालावधीत त्या स्थानकांदरम्यान अप-डाऊनच्या लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ठाणे-पनवेल मार्गावरील गाड्याही या वेळेत रद्द असतील. तसेच पनवेल-अंधेरी मार्गावरील लोकल सेवाही या कालावधीत रद्द करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ठाणे-नेरूळ, पनवेल-बेलापूर आणि सीएसटी-वाशी मार्गावर विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)