सीईटी परिक्षेस शेकडो विद्यार्थी मुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 02:31 PM2017-07-22T14:31:47+5:302017-07-22T14:31:47+5:30

आज राज्यभरात शिक्षक पात्रता परिक्षा ( सीईटी ) पार पडल्या. या परिक्षेत शेकडो विद्यार्थी मुकले.

CET exams have lost hundreds of students | सीईटी परिक्षेस शेकडो विद्यार्थी मुकले

सीईटी परिक्षेस शेकडो विद्यार्थी मुकले

Next

ऑनलाइन लोकमत

तळोजा, दि. 22 -  आज राज्यभरात शिक्षक पात्रता परिक्षा ( सीईटी ) पार पडल्या. या परिक्षेत शेकडो विद्यार्थ्यांना परिक्षेला मुकावे लागल्याने विद्यार्थ्यामध्ये मोठा गोंधळ उडाला. पनवेल विभागात विविध केंद्रावरील शेकडो विद्यार्थी आज या परिक्षेला मुकले आहेत. त्यामुळे विद्यार्थांमध्ये रडारड पहावसाय मिळाली. 
 
कळंबोली शहरात विद्यार्थ्यांना पोलिसांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले. यातील बरेच विद्यार्थी अलिबाग , पेण , वडखळ अशा लांब पल्याच्या ठिकाणाहून आले होते. सकाळ पासून बरसणारा मुसळधार पाऊस तसेच रस्त्यावरील खड्डे व यामुळे झालेली वाहतूक कोंडी यामुळे उशिर झाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. मात्र शिक्षण विभागाच्या नियमापुढे ही सबब चालू शकली नाही.
 
नवीन पनवेल सिकेटी विद्यालय व कळंबोली सुधागड कॉलेज येथे या प्रकाराने एकच गोंधळ उडाला होता. विद्यार्थ्यांना खूप उशिर झाल्याने आम्ही त्यांना परिक्षेस बसू देऊ शकत नसल्याचे जिल्हा शिक्षण अधिकारी शेषराव बडे यांनी सांगितले आहे.

Web Title: CET exams have lost hundreds of students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.