शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
4
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
5
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
6
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
7
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
8
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
9
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
11
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
12
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
13
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
14
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
15
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
16
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
17
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
18
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...
19
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड

कामोठयात फेरीवाल्यांना चोपणा-या मनसे कार्यकर्त्यांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 10:52 AM

कामोठेमध्ये फेरीवाल्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे.  सुधीर नवले, अविनाश पडवळ मिलिंद खाडे या तिघांना मंगळवारी सकाळी पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देदुकानदार आणि ढोलम यांची चर्चा सुरू असताना परिसरातले फेरीवाले तिथं गोळा झाले, त्यांनी ढोलम आणि यांच्य सहका-यांवर हल्ला केला आणि बेदम मारहाण केली. या हल्ल्यात शेवाळेंच्या कवटीला फ्रॅक्चर झालं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

नवी मुंबई - कामोठेमध्ये फेरीवाल्यांना झालेल्या मारहाणी प्रकरणी पोलिसांनी मनसेच्या तीन कार्यकर्त्यांना अटक केली आहे.  सुधीर नवले, अविनाश पडवळ मिलिंद खाडे या तिघांना मंगळवारी सकाळी पोलिसांनी अटक केली. विक्रोळीत मराठी पाटयांसाठी निवेदन द्यायला गेलेल्या मनसे पदाधिका-यांना फेरीवाल्यांकडून मारहाण झाल्यानंतर कामोठेमध्ये मनसेने फेरीवाल्यांविरोधात उग्र आंदोलन केले. कामोठेमध्ये मनसैनिकांनी फेरीवाल्यांना जबर मारहाण करत त्यांचे स्टॉल उखडून टाकले. फेरीवाल्यांना अक्षरक्ष तिथून पळवून लावले. यापूर्वीही मनसेने फेरीवाल्यांविरोधात कामोठेमध्ये उग्र आंदोलन केले आहे. 

रविवारी मनसेचे विक्रोळीतले उपविभाग अध्यक्ष विश्वजित ढोलम, विनोद शिंदे आणि उपशाखा अध्यक्ष उपेंद्र शेवाळे एका दुकानावर मराठी पाटी लावावी या मागणीसंदर्भात दुकानदाराला भेटण्यासाठी गेले होते. दुकानदार आणि ढोलम यांची चर्चा सुरू असताना परिसरातले फेरीवाले तिथं गोळा झाले, त्यांनी ढोलम आणि यांच्य सहका-यांवर हल्ला केला आणि बेदम मारहाण केली. उपेंद्र शेवाळेंच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हल्ला करण्यात आला.

या हल्ल्यात शेवाळेंच्या कवटीला फ्रॅक्चर झालं असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी तीन जणांना अटक केली असून त्यांच्यावर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विश्वजीत ढोलम यांच्या डोक्याला दुखापत झाली असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय. विश्वजीत ढोलम यांना मारहाण झाल्यानंतर मनसेचे पदाधिकारी पुन्हा त्या व्यापाऱ्याकडे जाब विचारायला गेले होते. तेव्हा फेरीवाल्यांनी मनसे कार्यकर्त्यांना अजून मारहाण केली. या मारहाणीत शिंदे आणि उपेंद्र शेवाळे हे जखमी झाले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी मनसेचे मालाडमधले नेते सुशांत माळवदे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता.

पुन्हा एकदा मनसेच्या गुंडांनी मार खाल्ला - संजय निरुपमविक्रोळीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिका-यांवर फेरीवाल्यांकडून झालेल्या हल्ल्याचे मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी समर्थन केले आहे. काल विक्रोळीत मनसेच्या गुंडांनी पुन्हा मार खाल्ला. आमचा हिंसेवर विश्वास नाही पण गरीबांच्या पोटावर जेव्हा मनसेचे गुंड लाथ मारणार तेव्हा प्रतिक्रिया ही उमटणारच. त्यामुळे मनसेने गुंडगिरी सोडून द्यावी असे संजय निरुपम यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे. 

टॅग्स :MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरे