- नामदेव मोरे नवी मुंबई : वाशी सागर विहार परिसरामध्ये तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेमुळे अमली पदार्थांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नवी मुंबईसह पनवेल परिसरामध्ये गांजासह इतर अमली पदार्थांची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. उद्याने व इतर सार्वजनिक ठिकाणी गर्दुल्ल्यांचे अड्डे तयार झाले आहेत. स्थानिक पोलीस स्टेशनकडून सातत्याने व गांभीर्याने कारवाई केली जात नसल्याचा आरोप नागरिकांकडून होऊ लागला आहे.नवी मुंबई, पनवेल व उरण परिसराचा झपाट्याने विकास होत असून येथील गुन्हेगारीमध्येही वाढ होऊ लागली आहे. पूर्वी सर्वाधिक डान्स बार असणारा विभाग म्हणून या परिसराची ओळख होऊ लागली होती. आता या परिसरातील अमली पदार्थांचे अड्डे वाढू लागले आहेत. दिल्ली पोलिसांनी जुलैमध्ये जेएनपीटी परिसरामध्ये धाड टाकून तब्बल १३०० कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त केले. १५ सप्टेंबरला मुंबई एटीएसच्या पथकाने तळोजामध्ये धाड टाकून ५२ कोटी रुपये किमतीची एमडी पावडर जप्त केली असून, एमडी बनविण्याचा अड्डा उद्ध्वस्त केला. मात्र, या दोन्ही ठिकाणच्या कारवाया करण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले नव्हते. आयुक्तालय क्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी खलेआम तर काही ठिकाणी चोरून अमली पदार्थांची विक्री होत आहे. एपीएमसीच्या भाजी मार्केटमध्ये गांजा विक्री पुन्हा सुरू झाली आहे. कोपरखैरणे परिसरामध्येही गांजाविक्री मोठ्या प्रमाणात होत असून नागरिकांनी वारंवार याविषयी तक्रारी केल्या आहेत.तुर्भे स्टोअर, तुर्भे परिसरामधूनही वांरवार तक्रारी येत असतात. नेरुळ बालाजी टेकडीच्या पायथ्याशी असणाऱ्या झोपडीमध्ये अनेक वर्षांपासून गांजाव्रिकी केली जाते; परंतु अद्याप ती झोपडी हटविण्यात आलेली नाही.नवी मुंबईमधील अनेक उद्यानांमध्ये गांजाविक्री करणारे तरुण बसलेले असतात. सीवूड, नेरुळ सेक्टर ६, वाशीमधील मिनीसीशोर व इतर उद्याने अमली पदार्थ सेवन करणाऱ्यांचे अड्डेच बनले आहेत. पनवेल व उरण परिसरामध्येही हे प्रमाण वाढले आहे, अमली पदार्थ विरोधी पथक व गुन्हे शाखेनेही पनवेलमध्ये अनेक ठिकाणी कारवाई केली आहे; परंतु कारवाईनंतर पुन्हा काही दिवसांमध्ये अमली पदार्थांची विक्री सुरू होते. तरुणांना व्यसनांच्या जाळ्यात अडकविले जात आहे.पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत; परंतु स्थानिक पोलीस स्टेशनकडून कधीच सातत्यपूर्ण कारवाई होत नाही. परिणामी, अमली पदार्थांचे अड्डे सुरूच राहत आहेत. अमली पदार्थांचे सेवन करणारे सापडल्यानंतरही त्यांच्यावरही गुन्हा दाखल करणे आवश्यक आहे; पण पोलीस गांभीर्याने कारवाई करत नसल्यानेच शहरातील स्थिती गंभीर झाली आहे.वाशीमध्ये अमली पदार्थ सेवन करणाºयांनी तरुणावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार निदर्शनास आल्यानंतर अमली पदार्थांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणनेरुळ सेक्टर ६ सारसोळेमधील उद्यान, सीवूड, वाशीमधील सीशोर परिसरामध्ये मध्यरात्रीपर्यंत अमली पदार्थ ओढणाºया तरुणांचा वावर असतो. सारसोळेमधील उद्यानामध्ये रात्री उशिरा जाण्याचीही भीती नागरिकांना वाटत असते. गर्दुल्ल्यांकडून हल्ला होण्याची शक्यता असते. बालाजी टेकडीच्या पायथ्याशी असणाºया झोपडीमध्ये होत असलेल्या गांजा विक्रीविषयी वारंवार तक्रारी केल्यानंतरही तो अड्डा पूर्णपणे बंद कधीच झाला नाही. यामुळे आता तक्रार करणाºया नागरिकांना भीती वाटू लागली आहे.‘लोकमत’ने उठविला आवाजवाशीमध्ये अमली पदार्थ ओढणाºयांनी तरुणावर लैंगिक अत्याचार केले. या प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. अमली पदार्थ ओढणाºयांकडून गंभीर गुन्हे घडू शकतात हे ‘लोकमत’ने सातत्याने निदर्शनास आणून दिले आहे. शहरातील गांजा, चरसच्या अड्ड्याचे स्टिंग आॅपरेशन करून प्रशासनाच्या या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या आहेत. पोलीस आयुक्तांनीही सर्व पोलीस स्टेशनला कडक कारवाईचे आदेश दिले आहेत; परंतु यानंतरही पोलीस स्टेशन स्तरावर सातत्याने कारवाई होत नाही.पोलिसांकडून कारवाईची अपेक्षाअंमलीपदार्थ विरोधात गुन्हे शाखा व अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून मोठया प्रमाणात कारवाई करण्यात आली आहे परंतु स्थानिक पोलिस स्टेशनमधील पोलिस कर्मचाºयांकडून प्रभावीपणे कारवाई केली जात नाही. नेरूळ, सीबीडी, तुर्भे, एपीएमसी, कोपरखैरणे व अनेक ठिकाणी अंमली पदार्थांची विक्री व सेवन करणाºयांचे अड्डे सुरू असल्याच्या तक्रारी नागरीक करत असतात. परंतु या तक्रारींची गांभिर्याने दखल घेतली जात नसल्याने नागरीकांमधील नाराजी वाढत आहे.अमली पदार्थ विरोधी पथकाचे छापासत्रवाशीमध्ये घडलेल्या घटनेनंतर अमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात सर्वत्र छापासत्र सुरू केले आहे. गुरुवारी तुर्भे एमआयडीसी परिसरात गस्त घालत असताना तुर्भे नाका येथे नसीम बानो गणी शेख उर्फ लाली ही महिला अमली पदार्थांची विक्री करत असताना आढळून आली. तिला अटक केली असून तिच्याकडून ७० ग्रॅम एम्फेटामाइन हा अमली पदार्थ जप्त केला आहे. एजाज आलम शेख तुर्भे गाव व सैफ मेहमूद शेख आंबेडकर नगर तुर्भे नाका या दोघांना अटक करून त्यांच्याकडून दोन किलो २०० ग्रॅम वजनाचे चिलीम व भांग जप्त केले आहे. एक महिलेलाही अटक केली असून तिच्या घरामध्ये ३०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला आहे. एकूण ६८ हजार रुपये किमतीचा गांजा, साडेतीन लाख रुपये किमतीचे एम्फेटामाइन जप्त केले असून संबंधितांवर गुन्हे दाखल केले आहेत.पनवेल परिसरामधील कारवाईचा तपशील१५ मार्च २०१८तळोजा-मुंब्रा मार्गावर १०० किलो गांजा जप्त२२ मार्च २०१८मुंबई-गोवा महामार्गावर ३७७ किलो गांजा जप्त१९ जून २०१८कळंबोलीमध्ये १६ किलो २०० ग्रॅम अफूसह कोडाईन जप्त२९ जून २०१८तळोजामध्ये सात लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त२ जुलै २०१८कळंबोलीमधून १९ लाख रुपये किमतीचे अफूसह कोडाईन जप्त२९ आॅगस्ट २०१८पनवेलमध्ये तीन किलो गांजा जप्त११ जानेवारी २०१९कळंबोलीमध्ये १0 किलो गांजा जप्त१९ जानेवारी २०१९पनवेलमधून ८ किलो गांजा जप्त१० एप्रिल २०१९पनवेल परिसरामध्ये चार किलो गांजा जप्त२३ जुलै २०१९कळंबोलीमध्ये दोन किलो गांजा जप्त, महिलेला अटक२६ जुलै २०१९दिल्ली पोलिसांनी जेएनपीटी परिसरामध्ये १३०० कोटी रुपये किमतीचे १३० किलो हेरॉईन केले जप्त१५ सप्टेंबर २०१९तळोजा परिसरात एमडी पावडरच्या कारखान्यावर धाड; ५२ कोटींचा साठा जप्तनवी मुंबई परिसरातील कारवाईचा तपशील२ मे २०१८२३ लाख रुपये किमतीची एमडी पावडर जप्त८ मे २०१८१९ एलएसडी पेपरसह एका आरोपीला अटक१३ जून २०१८घणसोलीमधून २० किलो गांजासह तिघांना अटक८ एप्रिल २०१८१ लाख ३८ हजार रुपये किमतीचे ब्राऊन शुगर जप्त२१ आॅक्टोबर २०१८ऐरोलीमधून २५ किलो कॅनाबिस ड्रगसह एकाला अटक९ फेब्रुवारी २०१८नेरुळमध्ये दीड किलो चरस जप्त, एकाला अटक११ एप्रिल २०१९साडेचार लाख रुपये किमतीची एमडीपावडर जप्त२१ एप्रिल २०१९रबाळेमध्ये दोन किलो गांजा जप्त१७ जून २०१९कोपरखैरणेमध्ये ८५ लाख रुपये किमतीची ३१ किलो एमडी पावडर जप्त
अमली पदार्थांचे अड्डे नष्ट करण्याचे आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 11:32 PM