- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पंधरावे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांच्यापुढे शहरात विस्कटलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्याचे आव्हान उभे आहे. मागील अडीच वर्षात पोलीस व नागरिक यांच्यात प्रचंड दरी निर्माण झालेली आहे. अशातच काळानुसार नवी मुंबईतल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांना सामोरे जाण्याच्याही अनुषंगाने त्यांना ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. मावळते आयुक्त हेमंत नगराळे यांचा दोन महिन्यांपूर्वीच कार्यकाळ संपल्याने नव्या आयुक्तांप्रति सर्वांना उत्सुकता लागली होती. परंतु बदल्यांच्या प्रक्रियेतील विलंबामुळे ही उत्कंठा ताणली गेली होती. अखेर सोमवारी सकाळी नगराळे यांच्या बदलीसह नव्या आयुक्तांच्या नियुक्तीचे आदेश निघाले. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या सामग्री व तरतूद विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नगराळे यांची बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. पुढील दोन दिवसात ते कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यापुढे अनेक आव्हाने उभी राहणार असून, त्यांना ते कसे सामोरे जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील चार वर्षात तत्कालीन आयुक्त के. एल. प्रसाद व प्रभात रंजन यांच्या कार्यकाळात शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची भूमिका पोलिसांनी निभावली होती. त्याशिवाय सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण केलेला, तर पोलीस आणि नागरिक यांच्यातली दरी कमी करून पोलिसांची प्रतिमा उजळ करण्याचे कामही झाले होते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखताना एखाद्या गंभीर प्रसंगात कर्मचारी व अधिकारी यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचीही भूमिका तत्कालीन आयुक्तांनी निभावली होती. यामुळे अनेक गुन्ह्यांच्या तपासात नवी मुंबई पोलिसांनी राज्यासह देशात नावलौकिक मिळवला आहे. परंतु मागील दोन वर्षात शहरात कायदा व सुव्यवस्थेची ही घडी पूर्णपणे विस्कटली आहे. नेतृत्वच खंबीर नसल्याने अधिकारी व कर्मचारी यांचाही हिरमोड झाल्याचे पहायला मिळत होते. त्यामुळे नगराळे यांच्या बदलीकडे पोलिसांसह शहरवासीयांचेही लक्ष लागले होते.अशातच महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे तसेच न्यायव्यवस्थेविरोधातील वक्तव्यामुळे नगराळेंचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. शिवाय गतआठवड्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कळंबोली व कोपरखैरणेत चिघळलेली परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ते दाखवू शकले नाहीत. यामुळे उद्भवलेल्या प्रसंगांना यापुढे नवे आयुक्त संजय कुमार यांना सामोरे जायचे आहे.त्याशिवाय एकविसाच्या शतकातले शहर म्हणून नवी मुंबईची जडणघडण होत असताना इथल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांचेही आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. मागील काही महिन्यात शहरात सायबर हल्ल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. जे.एन.पी.टी. येथील एका बंदरासह वाशीतील रुग्णालयाची संगणकीय यंत्रणा हॅक करून खंडणी मागण्याचे गुन्हे घडले आहेत. यामुळे भविष्यातील गुन्हेगारी प्रकाराचे स्वरूप लक्षात घेऊन सायबर सेल सक्षम करण्याची भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे, तर विमानतळावरून सिडको व प्रकल्पबाधित यांच्यात उडत असलेल्या खटक्यादरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याचीही खबरदारी घेण्याकरिता त्यांना योग्य उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत.
विस्कटलेली घडी बसवण्याचे आव्हान; नागरिकांमधील संवाद वाढविण्याची गरज- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : पंधरावे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती झालेल्या संजय कुमार यांच्यापुढे शहरात विस्कटलेली कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्याचे आव्हान उभे आहे. मागील अडीच वर्षात पोलीस व नागरिक यांच्यात प्रचंड दरी निर्माण झालेली आहे. अशातच काळानुसार नवी मुंबईतल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांना सामोरे जाण्याच्याही अनुषंगाने त्यांना ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. मावळते आयुक्त हेमंत नगराळे यांचा दोन महिन्यांपूर्वीच कार्यकाळ संपल्याने नव्या आयुक्तांप्रति सर्वांना उत्सुकता लागली होती. परंतु बदल्यांच्या प्रक्रियेतील विलंबामुळे ही उत्कंठा ताणली गेली होती. अखेर सोमवारी सकाळी नगराळे यांच्या बदलीसह नव्या आयुक्तांच्या नियुक्तीचे आदेश निघाले. पोलीस महासंचालक कार्यालयाच्या सामग्री व तरतूद विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकपदी नगराळे यांची बदली झाली आहे. तर त्यांच्या जागी पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अप्पर महासंचालक संजय कुमार यांची वर्णी लागली आहे. पुढील दोन दिवसात ते कार्यभार स्वीकारण्याची शक्यता आहे. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्यापुढे अनेक आव्हाने उभी राहणार असून, त्यांना ते कसे सामोरे जातील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मागील चार वर्षात तत्कालीन आयुक्त के. एल. प्रसाद व प्रभात रंजन यांच्या कार्यकाळात शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्याची भूमिका पोलिसांनी निभावली होती. त्याशिवाय सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून त्यांच्यावर कायद्याचा धाक निर्माण केलेला, तर पोलीस आणि नागरिक यांच्यातली दरी कमी करून पोलिसांची प्रतिमा उजळ करण्याचे कामही झाले होते. तसेच कायदा व सुव्यवस्था राखताना एखाद्या गंभीर प्रसंगात कर्मचारी व अधिकारी यांच्या पाठीशी खंबीर उभे राहण्याचीही भूमिका तत्कालीन आयुक्तांनी निभावली होती. यामुळे अनेक गुन्ह्यांच्या तपासात नवी मुंबई पोलिसांनी राज्यासह देशात नावलौकिक मिळवला आहे. परंतु मागील दोन वर्षात शहरात कायदा व सुव्यवस्थेची ही घडी पूर्णपणे विस्कटली आहे. नेतृत्वच खंबीर नसल्याने अधिकारी व कर्मचारी यांचाही हिरमोड झाल्याचे पहायला मिळत होते. त्यामुळे नगराळे यांच्या बदलीकडे पोलिसांसह शहरवासीयांचेही लक्ष लागले होते.अशातच महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणात त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांमुळे तसेच न्यायव्यवस्थेविरोधातील वक्तव्यामुळे नगराळेंचा कार्यकाळ वादग्रस्त ठरला. शिवाय गतआठवड्यात मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान कळंबोली व कोपरखैरणेत चिघळलेली परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ते दाखवू शकले नाहीत. यामुळे उद्भवलेल्या प्रसंगांना यापुढे नवे आयुक्त संजय कुमार यांना सामोरे जायचे आहे.त्याशिवाय एकविसाच्या शतकातले शहर म्हणून नवी मुंबईची जडणघडण होत असताना इथल्या बदलत्या गुन्हेगारी स्वरूपांचेही आव्हान त्यांच्यापुढे असणार आहे. मागील काही महिन्यात शहरात सायबर हल्ल्याच्या गंभीर घटना घडल्या आहेत. जे.एन.पी.टी. येथील एका बंदरासह वाशीतील रुग्णालयाची संगणकीय यंत्रणा हॅक करून खंडणी मागण्याचे गुन्हे घडले आहेत. यामुळे भविष्यातील गुन्हेगारी प्रकाराचे स्वरूप लक्षात घेऊन सायबर सेल सक्षम करण्याची भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे, तर विमानतळावरून सिडको व प्रकल्पबाधित यांच्यात उडत असलेल्या खटक्यादरम्यान परिस्थिती हाताबाहेर जाणार नाही याचीही खबरदारी घेण्याकरिता त्यांना योग्य उपाययोजना राबवाव्या लागणार आहेत.