शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
3
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
4
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
5
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
6
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
7
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
8
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
9
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
10
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
11
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
12
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
13
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
14
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
15
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
16
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
18
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
19
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
20
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...

फुकट्या प्रवाशांचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 4:15 AM

एनएमएमटीची डोकेदुखी : विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५२५२ जणांवर कारवाई

नवी मुंबई : महापालिकेचा परिवहन उपक्रम तोट्यात आहे. दैनंदिन उत्पादनातील तूट भरून काढण्यासाठी उपक्रमाचे विविध स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. असे असले तरी एनएमएमटी व्यवस्थापनाला फुकट्या प्रवाशांची डोकेदुखी झाली आहे. फुकटात प्रवास करणाºयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चालू आर्थिक वर्षात तब्बल ५२५२ फुकट्या प्रवाशांवर एनएमएमटीने कारवाई केली आहे. हे प्रमाण गत वर्षीच्या तुलनेत अधिक असल्याचे दिसून आले आहे.एनएमएमटीच्या ताफ्यात वातानुकूलित आणि सर्वसाधारण अशा एकूण ४५२ बसेस आहेत. त्यापैकी ४१५ बसेस सध्या रस्त्यावर धावतात. या बसेस एकूण ७५ मार्गावर दररोज १२,६६९९.२ कि.मी. अंतर प्रवास करतात. यात ६४ वातानुकूलित बसेसचा समावेश असून त्या ११ मार्गांवर धावतात. एनएमएमटीतून दिवसाला साधारण २.६ लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, उरण आणि पनवेलपर्यंत एनएमएमटीच्या गाड्या धावतात. असे असले तरी विविध कारणांमुळे एनएमएमटीची सेवा तोट्यात चालली आहे. व्यवस्थापनाला उत्पन्नाचे निर्धारित ध्येय गाठताना कसरत करावी लागत आहे. उत्पन्न आणि खर्च याचा ताळमेळ घालताना उपक्रमाला कसरत करावी लागत आहे. त्यामुळे उपक्रमाचा गाडा हाकण्यासाठी महापालिकेच्या अनुदानावर अवलंबून राहवे लागत आहे. यातच फुकट्या प्रवाशांनी व्यवस्थापनासमोर आव्हान निर्माण केले आहे.एनएमएमटीच्या बसेसमधून फुकटात प्रवास करणाºया प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षी म्हणजेच २0१६-२0१७मध्ये उपक्रमाने एकूण ४0९५ फुकट्या प्रवाशांवर कारवाई करून त्यांच्याकडून ४ लाख ६३ हजार १0६ रुपयांचा दंड वसूल केला होता. तर चालू आर्थिक वर्षात म्हणजेच २0१७-१८ या कालावधीत तब्बल ५२५२ फुकट्या प्रवाशांवर उपक्रमाने कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ६ लाख २२ हजार ४६९ रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत दंडाचे प्रमाण ३४ टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसून आले आहे.चालकांना नियमित प्रशिक्षणएनएमएमटीचा कारभार सुरक्षित व लोकाभिमूख करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापनाचे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. सध्या उपक्रमाच्या तुर्भे आसुडगाव आणि घणसोली आगारात एकूण ९८१ चालक कार्यरत आहेत. या चालकांना वर्षातून तीन वेळा प्रशिक्षण दिले जाते. यात अपघात टाळणे, इंधनाची बचत, सुरक्षित प्रवास व व्यसनमुक्ती आदींचा समावेश आहे. त्यामुळे अपघातांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. तसेच इंधन वापरात बचत झाल्याचे दिसून आले आहे.१परिवहनच्या नादुरूस्त गाड्या हा नेहमीच चर्चेचा विषय बनला आहे. भररस्त्यात गाड्या बंद पडणे हे प्रकार नेहमीचेच झाले आहे. २0१७-२0१८ या आर्थिक वर्षात विविध मार्गावर धावणाºया एनएमएमटीच्या बसेसना १४६ अपघातांची नोंद झाली. यात ५ जणांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण गंभीर जखमी आहेत.२२0१६-२0१७ मध्ये एनएमएमटीचे एकूण १९९ अपघात नोंदविले गेले आहेत. यात ६ जणांचा मृत्यू झाला होता. तर १0 गंभीर जखमी झाले होते. अपघतांच्या प्रमाणात गतवर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात घट झाल्याचे दिसून आले आहे.

टॅग्स :Bus Driverबसचालक