चंद्रयान ३ च्या यशाचा कोपरखैरणेत जल्लोष: मिठाई वाटून आनंद साजरा

By कमलाकर कांबळे | Published: August 23, 2023 07:43 PM2023-08-23T19:43:54+5:302023-08-23T19:44:33+5:30

संजीव नाईक, संदीप नाईक यांनी तिरंगा फडकवून केला आनंद व्यक्त

Chandrayaan 3 success celebrated in Koparkhairane: Sweets are distributed | चंद्रयान ३ च्या यशाचा कोपरखैरणेत जल्लोष: मिठाई वाटून आनंद साजरा

चंद्रयान ३ च्या यशाचा कोपरखैरणेत जल्लोष: मिठाई वाटून आनंद साजरा

googlenewsNext

नवी मुंबई :  भारताच्या  चांद्रयान ३ च्या अभूतपूर्व  यशाचा आनंद उत्सव कोपरखैरणे येथे साजरा करण्यात आला.  माजी खासदार  संजीव नाईक आणि नवी मुंबई भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली चांद्रयान ३ विक्रम लॅन्डरच्या सॉफ्ट लँडिंगचे थेट प्रक्षेपण कोपरखैरणे येथे आयोजित करण्यात आले होते. या ऐतिहासिक मोहिमेच्या यशाचे साक्षीदार होण्यासाठी लोकप्रतिनिधी, नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मिठाई वाटून भारताच्या यशाचा आनंद गोड केला.चांद्रयान ३ची हुबेहूब प्रतिकृती देखील या ठिकाणी साकारण्यात आली होती.

संजीव नाईक यांनी चांद्रयान तीनच्या यशासाठी इस्रोच्या सर्व शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. महान शास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्या नावे तयार केलेल्या विक्रम लॅन्डरने चंद्राच्या भूपृष्ठावर सॉफ्ट लँडिंग केले. इस्रोचे  प्रमुख  एस. मोहन कुमार आणि त्यांच्या वैज्ञानिकांच्या संपूर्ण टीमने ऐतिहासिक अशी कामगिरी केलेली आहे. ही कामगिरी भविष्यात जगासाठी मार्गदर्शक ठरणारी असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. तर चांद्रयान ३ चे यश केवळ भारतासाठीच नाही, तर जगासाठी ऐतिहासिक आहे, अशी प्रतिक्रिया नवी मुंबई जिल्हा भाजपा अध्यक्ष संदीप नाईक यांनी व्यक्त केली. याप्रसंगी माजी नगरसेवक शंकर मोरे, माजी नगरसेवक केशव म्हात्रे, समाजसेवक रविकांत पाटील आदी मान्यवर.

Web Title: Chandrayaan 3 success celebrated in Koparkhairane: Sweets are distributed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.