पनवेलमध्ये महिला आरक्षणात बदल
By admin | Published: January 3, 2017 05:48 AM2017-01-03T05:48:54+5:302017-01-03T05:48:54+5:30
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रारूप महिला आरक्षणात बदल केलाआहे. जाहीर करण्यात आलेले प्रभाग व आरक्षण हे प्रारूप असून त्यांना निवडणूक आयोगाची मान्यता मिळवायची आहे
पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकांसाठी प्रारूप महिला आरक्षणात बदल केलाआहे. जाहीर करण्यात आलेले प्रभाग व आरक्षण हे प्रारूप असून त्यांना निवडणूक आयोगाची मान्यता मिळवायची आहे. त्यामुळे प्रभागात कोणताही बदल झाला तर आरक्षणही बदलू शकते.
पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०१७ साठी २७ डिसेंबर २०१६ रोजी आरक्षण जाहीर केले. या आरक्षणाबाबत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार प्रत्येक प्रवर्गात ५० टक्के महिलांना आरक्षण देणे गरजेचे असल्याने महिला आरक्षणात काही बदल करण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता क्र ांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे व उपआयुक्त मंगेश चितळे यांच्या उपस्थितीत महिलांच्या जागांसाठी पुन्हा सोडत काढण्यात आली.