फोटोमागे लपवले चेंजओव्हर स्विच; आठ लाखांची वीजचोरी पकडली, नेरूळमध्ये महावितरणची कारवाई

By योगेश पिंगळे | Published: February 23, 2024 06:07 PM2024-02-23T18:07:25+5:302024-02-23T18:08:32+5:30

महावितरणच्या नेरूळ उपविभागाच्या शाखा कार्यालय-१ चे शाखा अभियंता आशिष इंगळे हे मागील काही दिवसांपासून संशयित ग्राहकाच्या वीजवापरावर लक्ष ठेवून होते.

Changeover switch hidden behind photo; Electricity theft of eight lakhs caught, operation of Mahavitran in Nerul | फोटोमागे लपवले चेंजओव्हर स्विच; आठ लाखांची वीजचोरी पकडली, नेरूळमध्ये महावितरणची कारवाई

फोटोमागे लपवले चेंजओव्हर स्विच; आठ लाखांची वीजचोरी पकडली, नेरूळमध्ये महावितरणची कारवाई

नवी मुंबई : वीजचोरीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महावितरणने विविध मोहिमा हाती घेतल्या आहेत. यात नेरूळ विभागअंतर्गत करावे गावातील एका वीज ग्राहकाच्या घरी धाड टाकली असता त्याने शक्कल लावून फोटो फ्रेमच्या मागे चेंजओव्हर स्विच लपवून ४ एसींचा वापर सुरू केल्याचे आढळून आले. यामुळे त्याच्याकडून आठ लाख २१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.

महावितरणच्या नेरूळ उपविभागाच्या शाखा कार्यालय-१ चे शाखा अभियंता आशिष इंगळे हे मागील काही दिवसांपासून संशयित ग्राहकाच्या वीजवापरावर लक्ष ठेवून होते. सदर बाब त्यांनी नेरूळ उपविभागाचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनायक बुधवंत यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर बुधवंत यांच्या नेतृत्वाखाली दोन पथकांनी करावे गावात राहणाऱ्या ग्राहकाच्या घरी धाड टाकली. यावेळी अभियंता अविनाश आभाळे, कृष्णात पाटील व सारिका अष्टनकर आदी अधिकारी आणि सागर पाटील, प्रवीण दानव व महिला कर्मचारी स्वाती लाड या टीमने दीड तासाच्या प्रयत्नांनंतर या ग्राहकाने फोटो फ्रेमच्या मागे लावविलेल्या चेंजओव्हर शोधून त्याने चलाखीने केलेली ८ लाख २१ हजार रुपयांची वीजचोरी पकडली. यावेळी शाखा अभियंता इंगळे यांनी ग्राहकाकडून दंडदेखील वसूल केला. भांडुप परिमंडलाचे मुख्य अभियंता सुनील काकडे व वाशी मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता सिंहाजीराव गायकवाड यांनी बुधवंत आणि त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले.

Web Title: Changeover switch hidden behind photo; Electricity theft of eight lakhs caught, operation of Mahavitran in Nerul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.