कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 06:35 AM2024-10-30T06:35:52+5:302024-10-30T06:36:19+5:30
करमाळी- लोकमान्य टिळक टर्मिनल (२२११६) एक्स्प्रेसचा कणकवली स्थानकात सांयकाळी ४:२२ ऐवजी ४:३२ मिनिटांनी पोहचणार आहे.
नवी मुंबई : विविध मार्गावर धावणाऱ्या बिगर पावसाळी आठ गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे. गाड्यांच्या फेऱ्यानुसार सुधारित वेळापत्रकाची १ नोव्हेंबरपासून अमंलबजावणी केली जाणार आहे.
करमाळी- लोकमान्य टिळक टर्मिनल (२२११६) एक्स्प्रेसचा कणकवली स्थानकात सांयकाळी ४:२२ ऐवजी ४:३२ मिनिटांनी पोहचणार आहे. ७ नोव्हेेंबरपासून हा बदल लागू होणार आहे. त्याचप्रमाणे वास्को द गामा - पटणा (१२७४१) एक्स्प्रेसची रत्नागिरी स्थानकावर पोहोचण्याची सुधारित वेळ रात्री १२:३५
वाजता असणार आहे. तर मुंबई सीएसएमटी ते मडगाव जंक्शन मांंडवी एक्स्प्रेस नडवली स्थानकात दुपारी ४ वाजून ५ मिनिटांनी पोहचणार आहे.
या गाड्यांचा समावेश
लोकमान्य टिळक टर्मिनल - मंगळुरू सेंट्रल मत्स्यगंधा एक्स्प्रेस चिपळूण स्थानकावर सायंकाळी ७:४२ वाजता पोहचेल. १ नोव्हेंबरपासून हे वेळापत्रक लागू होणार आहे.
एर्नाकुलम जंक्शन - अजमेर (१२९७७), कोचुवेली - पोरबंदर एक्स्प्रेस ( २०९०९), भावनगर - कोचुवेली (१९२६०) तसेच पोरबंदर ते कोचुवेली (२०९१०) एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातही बदल केल्याचे कोकण रेल्वेने कळविले आहे.