शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

महाराष्ट्र भवनाच्या वास्तुत अजित पवारांनी सुचविले बदल, विधिमंडळातील दालनात सादरीकरण

By नारायण जाधव | Published: July 04, 2024 3:27 PM

या वास्तूची निविदा प्रक्रिया ही येत्या सोमवारपर्यंत सुरू होणार असून लवकरच महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन होऊन बांधकामाला सुरुवात होणार आहे.

नवी मुंबई :नवी मुंबईतील वाशी रेल्वेस्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन प्रकल्पाचे गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मुंबई येथील विधिमंडळातील दालनात अंतरिम सादरीकरण करण्यात आले.

यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, सहव्यवस्थापकीय संचालक (१) शंतनू गोयल, मुख्य कार्यकारी अभियंता शीला करुणाकर, अधीक्षक अभियंता अर्जुन अनोसे, वास्तुविशारद हितेन शेट्टी, अभियंत्या तेजस्विनी पंडित व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.या वास्तूची निविदा प्रक्रिया ही येत्या सोमवारपर्यंत सुरू होणार असून लवकरच महाराष्ट्र भवनाचे भूमिपूजन होऊन बांधकामाला सुरुवात होणार आहे.

यावेळी पवार यांनी महाराष्ट्र भवन संकल्पित चित्रामध्ये काही किंचित फेरबदल करून लवकरात लवकर भव्य-दिव्य असे महाराष्ट्र भवनाची निविदा प्रक्रिया पूर्ण करून तातडीने भूमिपूजन करून बांधकामाला सुरुवात करावी, असे आदेश सिडको व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगल व संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या सुविधा असणार महाराष्ट्र भवनात

महाराष्ट्र भवनाची अशी सुंदर प्रतिकृती बघितल्यावर खरेच देशात अशी वास्तू उभारण्यात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. ही वास्तू १२ मजल्यांची असून, यामध्ये शयनगृहाच्या ११ खोल्या, अतिथीगृह दुहेरी शेअरिंगच्या ७२, अतिथीगृह डबल बेडच्या ६८ तसेच एक्झिक्युटिव्ह १० अशा एकूण १६१ खाेल्या असणार आहेत. तसेच लोकप्रतिनिधी सोबत येणारे त्यांचे वाहनचालक किंवा कर्मचाऱ्यांकरिताही खोल्या असणार आहेत. त्याचबरोबर ई लायब्ररी, कॉन्फरन्स हॉल, मिटिंग रूम, फूड प्लाझा, दुचाकी व चारचाकी वाहनतळ अशा अनेक विविध प्रकारच्या सर्व सुविधा या महाराष्ट्र भवनामध्ये पहावयास मिळणार आहेत.

प्रथमदर्शनी भागात शिवाजी महाराजांचा बैठी पुतळा

महाराष्ट्र भवनाचे प्रथमदर्शनी भागामध्ये महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा बैठी पुतळा असणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेने भवनामध्ये प्रवेश करताच छत्रपती शिवाजी महाराज होऊन त्यानंतरच महाराष्ट्राची आठवण होणार आहे.

मंदा म्हात्रेंचा पाठपुरावा

आमदार मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले की, ज्या महाराष्ट्र भवनासाठी २०१४ पासूनच्या लढ्याला आता पूर्णविराम लागला असून या वास्तूचा फायदा हा नवी मुंबईलाच नव्हे पूर्ण महाराष्ट्र राज्याला होणार असल्याचे सांगितले. महाराष्ट्र भवनाचा प्रश्न हा लवकरात लवकर मार्गी लावल्याबद्दल त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार तसेच सिडको व्यवस्थापकीय संचालकांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAjit Pawarअजित पवारManda Mhatreमंदा म्हात्रे