शहरात महागड्या कारला पसंती

By Admin | Published: April 11, 2016 01:42 AM2016-04-11T01:42:42+5:302016-04-11T01:42:42+5:30

नवी मुंबईकरांच्या बदल्या जीवनशैलीनुसार महागड्या कारची मागणी वाढत असून, त्यामध्ये इम्पोर्टेड (आयात) कारचाही समावेश आहे.

Cheap car in the city likes | शहरात महागड्या कारला पसंती

शहरात महागड्या कारला पसंती

googlenewsNext

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
नवी मुंबईकरांच्या बदल्या जीवनशैलीनुसार महागड्या कारची मागणी वाढत असून, त्यामध्ये इम्पोर्टेड (आयात) कारचाही समावेश आहे. त्यानुसार दोन वर्षांत ९० इम्पोर्टेड कारची नोंदणी वाशी आरटीओ कार्यालयात झालेली आहे. याशिवाय कार घेण्याची कुवत असतानाही केवळ पार्किंगच्या गैरसोयीमुळे अनेकांकडून दुचाकीला प्राधान्य मिळत असल्याचे दोन वर्षांतल्या नोंदीवरून स्पष्ट होत आहे.
मुंबईला पर्यायी शहर म्हणून नवी मुंबई शहराची निर्मिती करण्यात आलेली आहे. परंतु शहर निर्माण करताना नियोजनाचा अभाव ठरल्याचे गत काही वर्षांत उघड होऊ लागले आहे. शहराच्या नियोजनातील अशा त्रुटींच्या अभावाचा काहीसा फटका नागरिकांच्या जीवनशैलीवरही पडू लागला आहे. मागील काही वर्षांत नवी मुंबईकरांच्या जीवनशैलीत कमालीचा बदल झाला आहे. शहरातली शिक्षण व्यवस्था व उद्योग व्यवसायामुळे अनेकांचे राहणीमान उंचावलेले आहे. यावेळी प्रतिष्ठेचा भाग, आवड किंवा गरज म्हणून खासगी कार खरेदीत महागड्या कारला पसंती दर्शवली जात आहे. मागील दोन वर्षांत नवी मुंबई आरटीओकडे ५० लाखांवरील २३२ कारची नोंद झालेली आहे. यामध्ये रोल्स रॉयस, रेंज रोवर, जागुअर, मर्सिडिज अशा कारचा समावेश आहे. काही वर्षांपूर्वी मोजक्याच व्यक्तींकडे दिसणाऱ्या या सर्वाधिक महागड्या कारची संख्याही सद्य:स्थितीला वाढला आहे.
एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०१६ दरम्यान नवी मुंबई आरटीओमध्ये ९ हजार ७९४ कारची नोंद झाली आहे. त्यामध्ये ५० लाखांवरील १३४ कार असून ४५ कार इम्पोर्टेड आहेत. तर २०१४-१५ या आर्थिक वर्षात ९० लाखांवरील ९८ कारची नोंद झालेली असून, त्यामध्येही ४५ कार इम्पोर्टेड आहेत. यावरून नवी मुंबईकरांची महागड्या कारची मागणी वाढत असल्याचे दिसत आहे. परंतु कारच्या तुलनेत दुचाकीच्या नोंदीचा आकडा सर्वाधिक आहे.
एप्रिल २०१५ ते फेब्रुवारी २०१६ दरम्यान २२ हजार १६४ नव्या दुचाकीची नोंद झालेली आहे. त्यामध्ये हार्ले डेविडसन, रॉयल इन्फिल्ड, पल्सर या दुचाकींचा समावेश असून, त्यांची किंमत ९० हजार ते ७ लाख रुपयांपर्यंतची आहे. महागड्या दुचाकींना पसंती दर्शवणाऱ्यांपैकी अनेकांची कार घेण्याची कुवत असतानाही त्यांच्याकडून दुचाकीला प्राधान्य मिळालेले आहे. याकरिता राहत्या परिसरात पार्किंगची समस्या हे मुख्य कारण आहे.
सद्य:स्थितीला नवी मुंबई ही सिडको विकसित नोड व मूळ गाव अशा दोन भौगोलिक भागात विभागली आहे. परंतु पार्किंगची समस्या मात्र दोन्ही ठिकाणी सारखीच आहे. पुरेशा नियोजनाअभावी विकसित नोडमध्ये पार्किंगची सोय नसल्याने रस्त्यालगत वाहने उभी केली जात आहेत, तर काही इमारतींमध्ये पार्किंगच्या जागेत अतिक्रमण झाल्यामुळे पार्किंगची समस्या भेडसावत आहे.

Web Title: Cheap car in the city likes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.