बांधकाम व्यावसायिकाने केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 02:07 AM2017-08-03T02:07:30+5:302017-08-03T02:07:30+5:30
पनवेल तालुका व इतर परिसरातील इमारतीमध्ये व चाळीमध्ये स्वस्तात घर देतो, असे सांगून अनेक भामट्या बिल्डरांनी गेल्या तीन वर्षांत हजारो ग्राहकांना कोट्यवधी रु पयांना चुना लावला आहे.
पनवेल : पनवेल तालुका व इतर परिसरातील इमारतीमध्ये व चाळीमध्ये स्वस्तात घर देतो, असे सांगून अनेक भामट्या बिल्डरांनी गेल्या तीन वर्षांत हजारो ग्राहकांना कोट्यवधी रु पयांना चुना लावला आहे. फसव्या जाहिरातींना भुलून ग्राहकांनी आपल्या आयुष्याची पुंजी लावली आहे. अशाच प्रकारे नवीन पनवेल येथील बांधकाम व्यावसायिक ब्रिजेश नायरविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खांदेश्वर पोलीस ठाण्यात फसवणूक करणाºया बिल्डरांविरोधात जवळपास ५० गुन्हे दाखल आहेत. स्वस्तात घर देण्याचे आमिष दाखवून शेकडो नागरिकांना भुलवले जात आहे. खोपोली येथे राहणारे युवराज रामचंद्र साळवी (४०) यांनी नवीन पनवेल येथे बांधकाम व्यावसायिकाचे कार्यालय थाटलेल्या ब्रिज किंग कन्स्को प्रायव्हेट लिमिटेडकडे २०१५ मध्ये ३ लाख ५६ हजार ५०० रु पये बुकिंग रक्कम भरून १ बीएचके बुक केले होते. मात्र, दोन वर्षे उलटून गेली तरी देखील या इमारतीचे बांधकाम काही केल्या सुरू होत नव्हते. त्यानंतर या कार्यालयातील राकेश वाडकर यांनी पुन्हा एकदा युवराज साळवी यांना फोन करून नवीन इमारतीच्या योजनेची माहिती सांगितली. २० टक्के बुकिंग रक्कम देऊन उरलेली ८० टक्के रक्कम ताबा दिल्यानंतर भरण्यास सांगितले. त्यानुसार साळवी यांनी सुरु वातीला बुक केलेला १ बीएचके रूम रद्द करून नवीन योजनेनुसार ३० लाख रु पये किंमत असलेला २ बीएचके रूम बुक केली. साळवी यांनी यापूर्वी ३ लाख ५६ हजार ५०० रु पये भरले होते त्यात आणखी १ लाख ५० हजार रु पये भरून २० टक्के रक्कम पूर्ण केली. असे एकूण ५ लाख ६ हजार ५०० रुपये भरून देखील साळवी यांना रूम बांधून देण्यास टाळाटाळ करण्यात आली. तसेच इमारतीचे काम देखील सुरु करण्यात आले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे साळवी यांच्या लक्षात आले. साळवी यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात बांधकाम व्यावसायिक ब्रिजेश नायर व राकेश वाडकर यांच्याविरोधात फसवणुकीची तक्रार के ली. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.