पनवेलमध्ये बांधकाम व्यावसायिकाकडून फसवणूक
By admin | Published: May 13, 2017 01:19 AM2017-05-13T01:19:24+5:302017-05-13T01:19:24+5:30
मुदतीत फ्लॅट न देता, पैसेही परत देण्यास नकार देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
पनवेल : मुदतीत फ्लॅट न देता, पैसेही परत देण्यास नकार देणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाविरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप चातुर असे बांधकाम व्यावसायिकाचे नाव आहे.
नवीन पनवेल सेक्टर १५ येथे एस. एम. एन्टरप्राईझेस या नावाने चातुर या बांधकाम व्यावसायिकाने कार्यालय थाटले होते. त्यांनी सिया अपार्टमेंट गट नंबर ३९, विचुंबे येथे इमारत बांधतो असे सांगून नागरिकांकडून पैसे जमा केले होते. मुंबई सायन येथील मनोज कनौजिया यांनी या इमारतीत २ सदनिका बुक केल्या होत्या. २६ लाखांपैकी ७ लाख कनौजिया यांनी चातुर यांना जानेवारी २०१४ ते मे २०१७ पर्र्यंत दिले होते. मात्र सव्वा दोन वर्षे झाली तरी फ्लॅट मिळाले नाही. तसेच पैसे परत देण्यासही व्यावसायिकाने नकार दिल्याने कनौजिया यांनी फसवणुकीची तक्रार दाखल केली.