जेएनपीटी परिसराला रक्तचंदन माफियांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 02:17 AM2018-09-11T02:17:50+5:302018-09-11T02:17:53+5:30

जेएनपीटी परिसरात मागील काही वर्षांत रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.

Check the bloodchain mafia in JNPT area | जेएनपीटी परिसराला रक्तचंदन माफियांचा विळखा

जेएनपीटी परिसराला रक्तचंदन माफियांचा विळखा

Next

- मधुकर ठाकूर 
उरण : जेएनपीटी परिसरात मागील काही वर्षांत रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. मागील काही वर्षांमध्ये ५ हजार टनपेक्षा जास्त रक्तचंदन जप्त करून ६० पेक्षा जास्त आरोपींना गजाआड करण्यात आहे. कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेशातील काही भागातून रक्तचंदन जेएनपीटीमध्ये आणले जात असून येथून ते विदेशात पाठविले जात असून ही तस्करी पूर्णपणे थांबविण्याचे आव्हान शासकीय यंत्रणेसमोर उभे राहिले आहे.
उरण परिसरातील वैष्णो लॉजिस्टिक कंटेनर यार्डवर डीआरआय विभागाने ४ सप्टेंबरला धाड टाकली होती. या धाडीत एका कंटेनरमधून साडेचार कोटी किमतीचे सुमारे १० टन रक्तचंदन पकडण्यात आले. अधिकृत सूत्रांकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार कस्टम, पोलीस, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मागील काही वर्षात विविध ठिकाणी आणि उरण परिसरात अनेक कंटेनर गोदामांवर धाडी टाकून सुमारे पाच हजार टनापेक्षा अधिक रक्तचंदनाचा साठा जप्त केला आहे. जप्त केलेल्या या रक्तचंदनाची किंमत आंतरराष्टÑीय बाजारपेठेत अब्जावधी रुपये आहे. या प्रकरणी विविध प्रकरणात सुमारे ६० आरोपींना अटक करण्यात सुरक्षा यंत्रणेला यश आले असले तरी मुख्य सूत्रधारांपर्यंत अद्याप पोहचता आलेले नाही. सहा-सात वर्षांपासून चंदन तस्करीचे प्रमाण वाढले आहे. परदेशात प्रामुख्याने चीन, मलेशिया, जपान, सिंगापूर आणि आशिया खंडातून भारतातील रक्तचंदनाला मोठी मागणी आहे. भारतात कर्नाटक, आंध्र, उत्तर प्रदेशातील काही भागातील जंगलात रक्तचंदनाची लागवड केली जाते. परदेशात दर्जानुसार १२० ते २०० डॉलर प्रति किलोच्या भावाने रक्तचंदन विकले जाते. परदेशात मिळणाºया प्रचंड भावामुळे आंतरराष्टÑीय माफियांनी रक्तचंदनाच्या तस्करीकडे आपला मोर्चा वळवला आहे.
सीमा शुल्क, डीआरआय विभागातील काही अधिकाºयांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार मागील काही वर्षांत जेएनपीटी परिसरातील कंटेनर गोदामे अणि इतर काही ठिकाणाहून कस्टम, डीआरआय, वनविभाग आणि पोलिसांनी टाकलेल्या विविध धाडीतून अब्जावधी रुपयांचा साठा जप्त केला आहे. आंतरराष्टÑीय माफियांमध्येच रक्तचंदन तस्करीच्या टोळ्या वाढल्या असून एक टोळी दुसºयांची माहिती पोलीस व इतर यंत्रणांना देऊ लागली आहे. प्रतिस्पर्धी टोळ्यांतील खबरेच आता दुश्मन तस्कर टोळ्यांच्या तस्करीची माहिती संबंधित सुरक्षा विभागाला देऊ लागल्याने मागील सहा-सात वर्षांत रक्तचंदन तस्करीच्या अनेक घटना उघडकीस आल्याची क बुलीही संबंधित सुरक्षा विभागाच्या एका अधिकाºयाने दिली.
रक्तचंदनाची तस्करी पूर्णपणे थांबविण्यासाठी या टोळ्यांचे म्होरके सापडणे आवश्यक असून ते शोधण्याचे आव्हान पोलीस,
सीमा शुल्क व इतर सर्व विभागांसमोर आहे.
रक्तचंदन तस्करीच्या महत्त्वाच्या घटना
मार्च २०१५ - मुंबई-गोवा महामार्गावर कल्हे गावाजवळ कंटेनरमध्ये ४१ लाख ६० हजार रुपये किमतीचे रक्तचंदन जप्त. पाच आरोपींना अटक
मार्च २०१८ - महसूल विभागाने मक्याच्या कणसाच्या पिशव्यांमधून २ कोटी ८५ लाख रुपयांच्या चंदनाची तस्करी करणाºया चौघांना अटक केली. दुबईला रक्तचंदन पाठविणार असल्याचे तपासात उघड झाले होते.
आॅगस्ट २०१३ - उरण रोडवर दोन कंटेनरवर छापा टाकून साडेआठ कोटी रुपये किमतीचे ४२ टन रक्तचंदन जप्त केले. या प्रकरणी दोघांना अटक केली होती.
जानेवारी २०११ - जेएनपीटीजवळ सीमा शुल्क विभागाच्या पथकाने धाड टाकून २ कोटी ९ लाख रुपये किमतीचे रक्तचंदन जप्त केले.

Web Title: Check the bloodchain mafia in JNPT area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.