पनवेल : पनवेल महापालिकेत सफाईचा ठेका असलेल्या साई गणेश इंटरप्रेझेंस या ठेकेदारांचा सफाई सुपरवायझर म्हणून काम पाहणाऱ्या राठोड नामक सुपरवायझरवर शनिवारी सकाळी सफाई कर्मचाऱ्यानेच चाकूहल्ला केल्याची घटना घडली. दिनेश राठोड असे या सुपरवायझरचे नाव आहे. त्याच्यावर हल्ला करणारे सफाई रवि गुंजाळ, सिद्धेश गायकवाड हे आहेत. या घटनेत राठोड हा गंभीर दुखापतग्रस्त झाला आहे. हल्ला करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव अद्याप समजले नाही. मात्र सुपरवायझर व सफाई कर्मचाऱ्यांमध्ये कामावरून नेहमीच खटके उडत असल्याने रागाच्या भरात सफाई कर्मचाऱ्याने हे पाऊल उचलल्याचे समजते. संबंधित घटनेची नोंद खारघर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. जखमी राठोड पनवेल उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे.
सफाई कंत्राटदाराच्या सुपरवायझरवर चाकूहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2019 10:14 AM