शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
2
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
3
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
4
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
5
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
6
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
7
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
8
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
9
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
10
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
11
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
12
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
13
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
14
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
15
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
16
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
17
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
18
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
19
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
20
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी

पनवेल पालिका प्रदूषणाची पातळी तपासणार, सुधाकर शिंदे यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 03, 2017 2:19 AM

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतीपैकी एक असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवाप्रदूषण वाढत चालले आहे.

- वैभव गायकरपनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात राज्यातील सर्वात मोठ्या औद्योगिक वसाहतीपैकी एक असलेल्या तळोजा औद्योगिक वसाहतीचा समावेश आहे. सध्याच्या घडीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हवाप्रदूषण वाढत चालले आहे. या प्रदूषणामुळे घातक रसायने हवेद्वारे मानवाच्या शरीरात प्रवेश करीत असतात. यामुळे कॅन्सर सारख्या रोगाची लागण होण्याची भीती आहे. हवेतील प्रदूषणाची पातळी तपासण्यासाठी पनवेल महानगरपालिका चार रियल टाइम मॉनेटरिंग मशिन विकत घेऊन त्या चार शहरांत बसवणार असल्याची माहिती आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी खारघर येथे शनिवारी पार पडलेल्या बैठकीत दिली.खारघर शहरातील कचरा वर्गीकरण, तसेच नजीकच्या तळोजा औद्योगिक वसाहतीमधून होणाºया प्रदूषणाच्या तक्रारीसंदर्भात या बैठकीचे आयोजन पालिकेच्या खारघर विभागीय कार्यालयात करण्यात आले होते. या बैठकीला आयुक्त शिंदे यांच्यासह नगरसेवक अभिमन्यू पाटील, नगरसेवक प्रवीण पाटील, नगरसेवक रामजी भाई बेरा, नगरसेविका नेत्रा किरण पाटील, नगरसेविका भारती विश्वनाथ चौधरी, आरती नवघरे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी प्रदीप डोके, श्रीराम हजारे आदीसह मोठ्या संख्येने शहरातील नागरिक उपस्थित होते. या वेळी शहरातील विविध ठिकाणी साचणारा कचरा, कचºयाचे वर्गीकरण या संदर्भात चर्चा करण्यात आली. तसेच आपल्या प्रभागातील नगरसेवकांशी संपर्क साधून आपला प्रभाग स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहनही आयुक्तांनी उपस्थितांना केले.सध्याच्या घडीला तळोजा आौद्योगिक वसाहतीला लागून असलेल्या खारघर, कळंबोली, कामोठे, तळोजा शहरांत मोठ्या प्रमाणात प्रदूषणाने येथील नागरिक त्रस्त आहेत. औद्योगिक वसाहतीमध्ये ९००पेक्षा जास्त कारखाने आहेत. मात्र, या कारखान्यांमार्फत रात्रीच्या वेळेला मोठ्या प्रमाणात प्रदूषित वायू हवेत सोडले जाते, अशी तक्रार नागरिकांनी केली. या कारखान्यांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे योग्यरीत्या नियंत्रण नसल्याचे वायुप्रदूषण वाढत चालले आहे. या बैठकीत आयुक्त डॉ. शिंदे यांनी तत्काळ पालिका प्रदूषणाचे मोजमाप करण्यासाठी मशिन विकत घेणार असल्याचे जाहीर केले. ही रियल टाइम मॉनेटरिंग मशिन पाच ते सहा लाखांच्या घरात आहे. खारघर, कळंबोली, कामोठे शहरांत मध्यवर्ती ठिकाणी या मशिन बसवल्या जातील, तसेच प्रदूषणासंदर्भात सर्व माहिती प्रत्येक शहरातील नागरिकांना देण्यात येईल. तसेच दोषी कारखान्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे आयुक्त डॉ. शिंदे यांनी या वेळी स्पष्ट केले.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अधिकाºयाने काढला पळया बैठकीला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ विभागाचे अधिकारी प्रदीप डोके हे उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी वसाहतीमधील चार कारखाने रात्रीच्या वेळेला बंद करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांनी त्यांना या कारखान्यांची माहिती देण्यास सांगितल्यावर त्यांनी मला पत्रकारांना माहिती देण्याचे आदेश नसल्याचे सांगत, या ठिकाणाहून पळ काढला.प्रदूषण थांबले नाही, तर संपूर्ण औद्योगिक वसाहतच बंद करावी लागेलतळोजा औद्योगिक वसाहतीमधील प्रदूषण चिंतेची बाब आहे. येथील दूषित पाण्यावर प्रक्रिया करणारे सीईटीपी प्लांट बंद असेल, तर इंडस्ट्री चालूच कशी काय राहू शकते? असा सवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाचे अधिकारी प्रदीप डोके यांना या वेळी विचारण्यात आला.लोकांच्या जीवाशी खेळायच असेल, तर इंडस्ट्री या ठिकाणी राहू दे नाय तर लोकांना या ठिकाणी राहू दे, असे सांगत एकप्रकारे इंडस्ट्रीचा बंद करण्याचे संकेत आयुक्त शिंदे यांनी या वेळी दिले. यावर उत्तर देताना डोके यांनी, प्रदूषण करणारे चार कारखाने आम्ही रात्रीच्या वेळेला बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई