एमआयडीसीत केमीकल कंपनीला आग; लाखो रूपयांचे साहित्य खाक
By नामदेव मोरे | Published: January 29, 2024 08:56 PM2024-01-29T20:56:37+5:302024-01-29T20:56:57+5:30
पावणे एमआयडीसीमधील दर्शन केमीकल कंपनीला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीमध्ये लाखो रूपयांचे साहित्य खाक झाले आहे.
नवी मुंबई : पावणे एमआयडीसीमधील दर्शन केमीकल कंपनीला सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आग लागली. आगीमध्ये लाखो रूपयांचे साहित्य खाक झाले आहे.
ठाणे बेलापूर औद्योगीक वसाहतीमध्ये पावणे येथे प्लॉट नंबर ए ३९ वरील दर्शन कंमीकलला सायंकाळी अचानक आग लागली. कंपनीमधील रसायनांनी पेट घेतल्यामुळे काही वेळेत संपूर्ण कंपनीमध्ये आग पसरली. एमआयडीसी व महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहचून आग विझविण्यास सुरुवात केली. परंतु आग मोठी असल्यामुळे कंपनीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
आगीमुळे हवेत धुराचे लोट दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आग लागल्याच्या ठिकाणी नागरिकांनी बघ्यांची गर्दी जमा झाली होती. मागील काही महिन्यात एमआयडीसीमध्ये आग लागण्याच्या घटना वाढत आहेत. कंपन्यांमध्ये आग विरोधी यंत्रणा सुस्थितीमध्ये आहे की नाही याची प्रशासनाने तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणारांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.