शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘टाटा’त होणार आता ३० हजार रुग्णांवर केमो, खाटांची संख्या दुप्पट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2023 9:01 AM

खाटांची संख्या दुप्पट : वर्षाला १० हजार शस्त्रक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : कर्करुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता खारघरमधील टाटा मेमोरियल रिसर्च ॲन्ड एज्युकेशन इन कॅन्सर सेंटरमध्ये रुग्ण खाटा व त्यासाठी आवश्यक असलेला मनुष्यबळ वाढविण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आधुनिक उपचार लक्षात घेता हेमॅटोलिम्फॉइड कॅन्सर सेंटर, ब्लड कॅन्सरच्या रुग्णांची पूर्तता करणारे देशातील सर्वांत मोठे केंद्र या ठिकाणी २०२४च्या अखेरीस कार्यान्वित केले जाणार आहे. १९ ऑपरेशन थिएटरमुळे दरवर्षी अंदाजे दहा हजार मोठ्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियांसह ५ हजार रुग्णांना रेडिएशन थेरपी,  २५ ते ३० हजार रुग्ण केमोथेरपी उपचार घेऊ शकणार असून, जवळपास ३ लाख २० हजार रुग्ण औषधोपचार घेऊ शकणार आहेत.

कर्करोगावर उपचार घेण्यासाठी महाराष्ट्रातूनच नाही तर देशभरातून रुग्ण खारघर येथील टाटा मेमोरियल रुग्णालयात येतात. आता खाटांच्या वाढणाऱ्या संख्येमुळे रुग्णांची गैरसोय दूर होणार असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन उरणचे आमदार महेश बालदी यांनी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे खाटांसह आवश्यक मनुष्यबळ वाढविण्याची मागणी टाटा हॉस्पिटलच्या विनंतीनुसार केली होती. यानंतर केंद्रीयमंत्री गडकरी यांनी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांच्याशी संवाद साधून पत्रव्यवहार केला होता. त्यानुसार टाटा हॉस्पिटलमधील मनुष्यबळ १०६७वरून २४०५, तर खाटांची संख्या ४००वरून ९३० करण्यात येणार असल्याचे बालदी यांनी सांगितले.

तीन महिन्यांत घेतला निर्णय

  या हॉस्पिटलमध्ये सद्यस्थितीत दोन इमारती म्हणजेच रेडिएशन रिसर्च युनिट आणि महिला-मुलांचे कर्करोग केंद्र कार्यान्वित आहे.   त्यामध्ये आता वैद्यकीय, नर्सिंग, तंत्रज्ञ, सुरक्षा, हाउसकिपिंग आणि प्रशासकीय अशा सर्व श्रेणींच्या कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे.   कर्करोग रुग्णांची परिस्थिती आणि उपचार या संदर्भात टाटा हॉस्पिटलचे डॉ. सुधीर गुप्ता यांच्याशी चर्चा केली होती.   त्या अनुषंगाने नोव्हेंबर २०२२ मध्ये या संदर्भात आम्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे वाढीव रुग्ण बेड आणि आणि मनुष्यबळाची मागणी केली होती.   त्यानुसार अवघ्या तीन महिन्यांत तातडीने निर्णय मोदी सरकारने घेतला असल्याचा दावा आमदार महेश बालदी यांनी केला.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाMumbaiमुंबईcancerकर्करोग