शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पोलिसांच्या आरोग्यावरून महासंचालकांचा घरचा अहेर

By admin | Published: April 18, 2017 6:49 AM

पोलीस खात्याचा कारभार लेट लतिफ असल्याचा घरचा अहेर पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिला आहे. पोलिसांचे मानसिक

नवी मुंबई : पोलीस खात्याचा कारभार लेट लतिफ असल्याचा घरचा अहेर पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी दिला आहे. पोलिसांचे मानसिक स्वास्थ्य सुदृढ राखण्याकरिता सुरू करण्यात आलेल्या आय कॉल या हेल्पलाइनच्या उद्घाटनप्रसंगी ते सीबीडी येथे उपस्थित होते. तसेच तीन वर्षे पाठपुरावा करूनही मंजूर न झालेली आरोग्य योजना स्वत: महासंचालक झाल्यावर अमलात आणल्याचेही त्यांनी सांगितले.मागणी करूनही वेळेवर सुविधा मिळत नसल्याच्या कारणावरून पोलीस खात्यातील बहुतांश अधिकारी व कर्मचारी खात्याच्या कारभारावर नाराज आहेत. अशातच पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनीही खात्याला घरचा अहेर दिला आहे. सीबीडी येथे कार्यक्रमप्रसंगी माथुर यांनी उदाहरणे देत खात्याचा कारभार लेट लतिफ असल्याची खंत व्यक्त केली. माथुर यांच्या प्रयत्नाने राज्यातील पोलिसांकरिता समुपदेशन हेल्पलाइन सुरू करण्यात येत आहे. राज्य पोलीस व टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने ही आरोग्य योजना राबवली जात आहे. त्याचे उद्घाटन पोलीस महासंचालक सतीश माथुर यांच्या हस्ते सीबीडी येथे करण्यात आले. मात्र ही योजना प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली. मानसिक तणावातून घडणाऱ्या आत्महत्येच्या घटना टाळण्याच्या उद्देशाने पोलिसांचे मानसिक स्वास्थ्य चांगले राखणाऱ्या आरोग्य योजनेची संकल्पना सुचली होती. परंतु तीन वर्षे पाठपुरावा करूनही अपयश आले. अखेर स्वत: पोलीस महासंचालक झाल्यानंतरच ही योजना यशस्वीरीत्या राबवू शकल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग, अपर पोलीस महासंचालक विनय कारगांवकर, संजयकुमार सिंघल, प्रज्ञा सरवदे, सह आयुक्त मधुकर पांडे, टाटा इन्स्टिट्यूटच्या संचालिका अपर्णा जोशी आदी उपस्थित होते. अनेकदा एक दुसऱ्याच्या वागण्याच्या पद्धतीवरून हिणवल्यामुळे त्या व्यक्तीच्या मानसिकतेवर परिणाम होवू शकतो. शिवाय प्रत्येकाच्या वागण्याची पध्दत भिन्न असल्यामुळे आपल्या विचाराप्रमाणे दुसरा वागेल अशी अपेक्षाच गैर असल्याचेही माथुर यांनी सांगितले. अशातच पोलीस खात्यात मानसोपचार तज्ज्ञांची कमतरता असल्यामुळे टिसच्या माध्यमातून हा उपक्रम राबवत असल्याचेही त्यांनी सांगितले. पोलिसांवर मानसिक ताण असल्यास त्यांना अवघ्या फोनवरून पोलिसांचे समुपदेशन करता यावे याकरिता आय कॉल ही हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. ०२२ २५५२११११ या क्रमांकावर संपर्क साधणाऱ्या पोलिसांना तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. ज्याप्रमाणे ताप, थंडी, सर्दी या आजारांवर उघडपणे डॉक्टरकडून उपचार घेतले जातात. त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्य ठीक नसल्यास देखील वेळीच तज्ज्ञाकडून उपचार करून घेण्याचीही गरज त्यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)