पनवेलमधील रुग्णालयाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 12:00 AM2019-09-11T00:00:47+5:302019-09-11T00:01:08+5:30

रायगड जिल्ह्यातील सामान्य जनतेसाठी, तसेच वाढत्या रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार पनवेल येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय व २० खाटांचे ट्रॉमा केअर युनिट पूर्णत्वास आले

Chief Minister inaugurates the hospital in Panvel today | पनवेलमधील रुग्णालयाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

पनवेलमधील रुग्णालयाचे आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

Next

पनवेल : पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयाचे बुधवारी, ११ सप्टेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच ते नागरिकांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील सामान्य जनतेसाठी, तसेच वाढत्या रस्ते अपघातातील जखमींना तातडीने उपचार मिळावे, यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मागणीनुसार पनवेल येथे १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालय व २० खाटांचे ट्रॉमा केअर युनिट पूर्णत्वास आले. रुग्णालयाच्या उभारणीपासून ते पूर्ण होईपर्यंत आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला. लोकार्पण सोहळ्यास राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, रायगड पालकमंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, निरंजन डावखरे, मनोहर भोईर, सुरेश लाड, बाळाराम पाटील, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांची प्रमुख उपस्थिती तर सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप कुमार व्यास, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. अनुप कुमार यादव, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख उपस्थित राहणार आहेत.

मेट्रोची मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत चाचणी
सिडकोच्या नवी मुंबई मेट्रोचा पहिला टप्पा दृष्टिपथात आला आहे. जवळपास ९0 टक्के कामे पूर्ण झाली असून पुढील काही महिन्यात प्रत्यक्ष मेट्रो सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बुधवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत तळोजा येथील मेट्रो शेडमध्ये मेट्रोची चाचणी घेतली जाणार आहे.

खारघरमध्ये मेट्रोखालील २४५ बॅनर्स हटवले
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी मुंबई मेट्रोच्या पहिल्या टप्प्याची चाचणी पार पडणार आहे. बेलापूर ते पेंधर दरम्यान खारघरमधील मेट्रो पिलरला लावलेले २४५ बॅनर पनवेल महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हटवले. गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी हे अनधिकृत बॅनर लावण्यात आले होते.

Web Title: Chief Minister inaugurates the hospital in Panvel today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.