शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
2
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
3
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
4
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
5
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
8
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
9
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
10
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
11
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
12
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
14
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
15
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
16
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
17
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
18
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
19
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
20
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान

थापा मारण्यात मुख्यमंत्री शिंदे पंतप्रधान मोदींच्याही पुढे; सुषमा अंधारेंचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2023 10:18 AM

तासाभराच्या भाषणातून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक घोटाळे, फसवणूकीचे आरोपानंतर गुन्हे दाखल झालेल्या  आपल्या राजकीय १५ निकटवर्तीयांना क्लीनचीट दिली असल्याचाही घणाघात केला.  

मधुकर ठाकूर

उरण :

थापा मारण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही पुढे असल्याची खरमरीत टीका शिवसेनेच्या फायरब्रॅड नेत्या सुषमा अंधारे यांनी उरण येथील मंगळवारी आयोजित जाहीर कार्यक्रमातुन केली. तासाभराच्या भाषणातून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक घोटाळे, फसवणूकीचे आरोपानंतर गुन्हे दाखल झालेल्या  आपल्या राजकीय १५ निकटवर्तीयांना क्लीनचीट दिली असल्याचाही घणाघात केला.  

नवीन शेवा शाखेचा ३५ वा वर्धापन दिनाचे औचित्य साधून मंगळवारी (३१) महाप्रबोधन मेळावा व हळदी- कुंकू समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.नवीन शेवा येथील शाळेच्या आवारात आयोजित कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या शिवसैनिकांसमोर सुषमा अंधारे यांची तोफ धडधडली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, सोमय्या, केसरकर आदींवर भाषणातून जोरदार घणाघात केला. राजकारणाला आता कोणतीही पातळीच उरलेली नाही.त्यामुळे रोजच महापुरुषांचा अपमान करायचा. त्यानंतर त्यावर चर्चेसाठी रान उठवून द्यायचे.यासाठी भाजप ग्रुपच्या लोकांना ठरवुन कामे दिली आहेत. त्यामुळे अच्छा किया वो हमने किया,बुरा किया वो उद्धव ठाकरेंने किया अशी घणाघाती टीका सुषमा अंधारे यांनी केली.ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स हे आदी विभागाच्या कारवाईच्या भीतीने ४० उंदीर अंधारातच पळून गेले.बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक महिलांचा आदर करतात.मात्र महिलांचे अपमान करत फिरणारे गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार शिवसैनिक  कसे असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राच्या भल्यासाठी गुहाटीला पळालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यपालांच्या विरोधात एकही शब्द काढत नाहीत.दिल्लीत मुजरा, गल्लीत गोंधळ या चित्रपटातील नारायण वाघांची भुमिका एकनाथ शिंदे यांनी स्विकारली आहे.

शिंदेच्या भुमिकेसमोर नारायण वाघही फिके पडतील अशीच असल्याची टीका अंधारे यांनी केली. टिकेनंतर सारवासारव करण्यासाठी सध्या मिंधे गटाचे गोडबोले प्रवक्ते दिपक केसरकर साखर पेरणी करीत फिरत आहेत.डाओसमध्ये जनतेचे ४० कोटी खर्च करून विविध कंपन्यांच्या सोबत १ लाख ४० कोटींचे करार केल्याचे शिंदे सांगत आहेत.यामध्ये साडेतीन कोटी भागभांडवल असलेल्या राज्यातील सहा महिन्यांपूर्वी स्थापन झालेल्या एका कंपनीसोबत २० हजार कोटींचा करार केला आहे. मात्र एकाच देशातील व्यापाऱ्यांशी करण्यासाठी दुसऱ्या देशात कशासाठी गेले हा प्रश्न जनतेला पडला असल्याचे अंधारे यांनी सांगितले.मात्र सत्तांतरानंतर सात-आठ महिन्यात कोणतेही भरीव काम न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांविरोधात सोमय्या अवाक्षरही काढत नाहीत.मुग गिळून बसले आहेत.हमने किया तो रासलीला,तुमने किया तो कॅरेक्टर ढिला स्वपक्षीयांवर मुग गिळून बसलेल्या किरीट सोमय्यावर जोरदार टिकास्त्र सोडले.

तासाभराच्या भाषणातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका करताना अंधारे यांनी ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्सच्या बळावर सुडाचे राजकारण सुरू केले आहे.मात्र ईडी, सीबीआय, इन्कमटॅक्स विभागाच्या अधिकाऱ्यांना भाजपचा एकही घोटाळेबाज अद्यापही सापडलेला नाही.मोदी यांचा मुंबई दौरा कशासाठी होता यावरही अंधारे यांनी खरमरीत टीका केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक घोटाळे, फसवणूकीचे आरोप, गुन्हे दाखल झालेल्या आपल्या राजकीय १५ निकटवर्तीयांना क्लीनचीट दिली आहे. कोवीड काळात रुग्णांकडे पाठ फिरवणाऱ्या आमदार महेश बालदी यांच्यावर टीका केली.पक्ष सोडून काही चंगु-मंगु गेल्याने फरक पडत नाही. पांडव पाच होते. मात्र १०० कौरवांना ते पुरुन उरले होते.बुंद-बुंदसे सागर बनता है .त्यामुळे आगामी येऊ घातलेल्या नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद, विधानसभा निवडणुकीत उध्दव ठाकरे गटाला यश मिळविण्यासाठी सर्व निष्ठावंतानी आता पासूनच कामाला लागा असे आवाहनही अंधारे यांनी कार्यकर्त्यांना केले.

उरण विधानसभा मतदारसंघातील २४ पैकी १८ ग्रामपंचायतींमध्ये उध्दव ठाकरे गटाने जिंकल्या आहेत.त्यामुळे धमाका तो बनता है,इलाका भी हमारा,धमाका भी हमारा त्यामुळे घटनाबाह्य सरकारचा पर्दाफाश करण्यासाठी महाप्रबोधन मेळाव्याला उपस्थित असल्याचे शिवसेनेच्या उपनेत्या ज्योती ठाकरे यांनी सांगितले. ४० जणांच्या चोरांच्या टोळीने पक्ष,पक्ष चिन्हच नव्हे तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पिताश्रींचे नावही चोरण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत.आता निष्ठावंत, प्रामाणिक शिवसैनिकांनी रडायचे नाही तर लढायचे.शिवसेना म्हणजे आमदार, खासदार तयार करणारी फॅक्टरी आहे.या शिवसेनेच्या फॅक्टरीत लवकरच १४० आमदार, खासदार  तयार होतील असा विश्वासही ज्योती ठाकरे यांनी व्यक्त केला.

यावेळी जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर, रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील,रायगड जिल्हा सहसंघटक रघुनाथ शिंदे, जेएनपीए कामगार ट्र्स्टी दिनेश पाटील,तालुकाप्रमुख संतोष ठाकूर यांचीही भाषणे झाली.या भाषणातून त्यांनी उरण मतदार संघ संघात गद्दारी करून नितीन गडकरी यांच्या नावाखाली निवडून आलेल्या अपक्ष आमदार महेश बालदी यांच्यावर जोरदार टीका केली.हवेत चालणारा गर्विष्ठ आमदार महेश बालदी यांना कोणत्याही समाजाबद्दल आत्मियता नाही.अशा गद्दारांना आधी उरण नगरपरिषदेतुन हद्दपार करा.त्यानंतर विधानसभा निवडणुकीत पराभव करून गद्दारांना त्यांची जागा दाखवा द्या असे भावनिक आवाहनही यावेळी वक्त्यांनी केले.यावेळी उरण विधानसभा मतदारसंघातील २४ पैकी १८ ग्रामपंचायतींमध्ये उध्दव ठाकरे गटाने जिंकल्या आहेत.या ग्रामपंचायतीतीत निवडून आलेल्या सरपंच, उपसरपंच, सदस्यांचा सत्कारही करण्यात आला.तसेच उध्दव ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्यांना अनेक कार्यकर्त्यांना शिवबंध बांधुन स्वागत करण्यात आले.

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारे