प्रभाग समित्यांच्या रचनेस मुख्यमंत्र्यांची स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2015 12:52 AM2015-08-25T00:52:28+5:302015-08-25T00:52:28+5:30

महापालिकेच्या सभागृहामध्ये तातडीचा ठराव मांडून करण्यात आलेल्या प्रभाग समित्यांच्या रचनेविषयी शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती.

The Chief Minister's postponement of the ward committee | प्रभाग समित्यांच्या रचनेस मुख्यमंत्र्यांची स्थगिती

प्रभाग समित्यांच्या रचनेस मुख्यमंत्र्यांची स्थगिती

Next

नवी मुंबई : महापालिकेच्या सभागृहामध्ये तातडीचा ठराव मांडून करण्यात आलेल्या प्रभाग समित्यांच्या रचनेविषयी शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. मुख्यमंत्र्यांनी या ठरावास स्थगिती दिली असून पुन्हा पारदर्शीपणे प्रभाग रचना करण्याचे आदेश दिले आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसला पूर्ण बहुमत मिळाले नाही. अपक्ष नगरसेवक व काँगे्रसच्या मदतीने पालिकेत सत्ता मिळविली आहे. शहरातील सर्व विशेष समित्या राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्या आहेत. परंतु दिघा, घणसोली व ऐरोली प्रभाग समित्या राष्ट्रवादी काँगे्रसच्या ताब्यातून निसटण्याची शक्यता निर्माण झाली होती. यामुळे आॅगस्ट महिन्याच्या तहकूब सर्वसाधारण सभेमध्ये प्रभाग समित्यांची फेररचना केल्याचा ठराव मांडून तो मंजूर करण्यात आला. राष्ट्रवादी काँगे्रसला फायदेशीर ठरतील अशाप्रकारे प्रभाग समित्यांची रचना करण्यात आली.
शिवसेना व भाजपा नगरसेवकांनी तीव्र आक्षेप घेवून आंदोलन केले होते. भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांच्याकडेही तक्रार केली होती. म्हात्रे यांनी सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेवून महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँगे्रसची मनमानी सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ प्रभाग समित्यांच्या रचनेस स्थगिती दिली आहे. पालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांना फोन करून पुन्हा पारदर्शीपणे रचना करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या स्थगितीमुळे सत्ताधारी राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. मंदा म्हात्रे यांनी महापालिका मुख्यालयात येवून, आयुक्तांची भेट घेवून त्यांना प्रभाग समिती रचना पुन्हा करण्याची सूचना केली. मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर म्हात्रे यांचे विरोधी पक्षनेते विजय चौगुले आणि इतर उपस्थित नगरसेवकांनी जल्लोषात स्वागत केले. (प्रतिनिधी)

Web Title: The Chief Minister's postponement of the ward committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.