मुख्यमंत्र्यांच्या अलिबाग दौऱ्यात काँग्रेसची निर्दशने?

By admin | Published: July 3, 2017 06:40 AM2017-07-03T06:40:09+5:302017-07-03T06:40:09+5:30

येथील खासगी डॉक्टरांच्या अनास्थेचा बळी ठरलेल्या युवकाच्या कुटुंबीयांनी आत्मदहनाचा दिलेला इशारा, अलिबाग येथील नाट्यगृहाने

Chief Minister's visit to Alibag, Congress's directives? | मुख्यमंत्र्यांच्या अलिबाग दौऱ्यात काँग्रेसची निर्दशने?

मुख्यमंत्र्यांच्या अलिबाग दौऱ्यात काँग्रेसची निर्दशने?

Next

विशेष प्रतिनिधी / लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : येथील खासगी डॉक्टरांच्या अनास्थेचा बळी ठरलेल्या युवकाच्या कुटुंबीयांनी आत्मदहनाचा दिलेला इशारा, अलिबाग येथील नाट्यगृहाने वाढीव अनधिकृत बांधकाम करूनही, त्या नाट्यगृहाला अलिबाग नगरपरिषदेच्या हक्काचे चार कोटी ७५ लाख रुपयांचे दिलेले अनुदान याविरोधात काँग्रेसने निर्दशने करण्याचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ७ जुलै रोजीचा संभाव्य अलिबाग दौरा चांगलाच चर्चेमध्ये आला आहे. काँग्रेसचे नेते मधुकर ठाकूर यांनी याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाला लेखी कळविले असल्याने काँग्रेस याप्रश्नी आक्र मक असल्याचे दिसून येते. अलिबाग येथे या नाट्यगृहाच्या कार्यक्र मास उपस्थित राहावे किंवा कसे? याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाने रायगड जिल्हा प्रशासनाचा अहवाल मागविला आहे.
अलिबाग जिल्हा रु ग्णालयात मणक्यावरील शस्त्रक्रि येदरम्यान मार्च २०१६मध्ये मृत्यू झालेल्या सूरज पाटील यांच्या मृत्यूप्रकरणामध्ये अलिबाग येथील खासगी रुग्णालय चालविणारे डॉ. चंद्रकांत साठे हे सरकारच्या चौकशी अहवालमध्ये दोषी आढळल्याने त्यांची वैद्यकीय व्यवसाय नोंदणी रद्द करण्याबाबतही सरकारने आदेश देऊनही आता जिल्हास्तरीय विशेषतज्ज्ञ समिती गठित करून डॉ. साठे यांना निर्दोष ठरविले आहे. गेली दीड वर्षे न्यायासाठी झगडणाऱ्या मृत सूरजच्या कुटुंबावर सरकारकडून अन्याय होत असल्याची भावना झाली आहे. अलिबाग येथे मुख्यमंत्री अथवा मंत्री येणार असतील, तर त्यांच्यासमोर संपूर्ण कुटुंबासह आत्मदहन करण्याचा इशारा मृत सूरज यांच्या कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनास दिला होता. त्यांना ३ जुलैला जिल्हा शल्य चिकित्सकांनी चर्चेसाठी बोलाविले आहे.
अलिबाग येथे ज्या खासगी सहकारी संस्थेच्या नाट्यगृहाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री येण्याचे प्रयोजन आहे. त्या नाट्यगृहाला आठ हजार चौरस फुटांचे बांधकाम अनुज्ञेय असताना, २५ हजार चौरस फुटांचे बांधकाम करून १७ हजार चौरस फुटांचे वाढीव अनधिकृत बांधकाम केल्याने या नाट्यगृहाला कोट्यवधींचे सरकारी अनुदान देऊ नये, अशी तक्र ार काँग्रेसतर्फे जिल्हाधिकाऱ्यांसह सरकारकडे याआधीच केली. सरकारच्या धोरणानुसार हे अनुदान स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नगरपरिषदेस मिळणे अपेक्षित असताना, खासगी संस्थेस दिल्याने काँग्रेसने नाट्यगृहाच्या उद्घाटनात निदर्शने करण्याचा इशारा दिला.

स्ट्रक्चरल आॅडिट नाही

नाट्यगृहाच्या इमारतीला तब्बल १३ वर्षे झाली आहेत. त्याच जुन्या इमारतीला फक्त रंगरंगोटी करून सजविल्याने स्ट्रक्चरल आॅडिट करण्याची मागणी मधुकर ठाकूर यांनी महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाकडे केली आहे, असे असतानाही स्ट्रक्चरल आॅडिट केले गेले नाही
नाट्यगृहाच्या वाढीव अनधिकृत बांधकामाच्या तक्र ारीबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, उपअधीक्षक,भूमिअभिलेख व महसूल विभाग यांच्यासह संयुक्त पाहणी करण्याची शिफारस सरकारला केल्याचेही ठाकूर यांनी सांगितले.

Web Title: Chief Minister's visit to Alibag, Congress's directives?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.