स्वीमिंग पूलमध्ये पडून बालकाचा मृत्यू

By Admin | Published: June 16, 2017 12:25 AM2017-06-16T00:25:03+5:302017-06-16T00:25:03+5:30

खारघर सेक्टर ३५मधील हाइड पार्क इमारतीच्या आवारातील स्वीमिंग पूलमध्ये पडून पाच वर्षीय मुलाचा जीव गेल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मनबीरसिंग बनवायत

Child's death by falling into the swimming pool | स्वीमिंग पूलमध्ये पडून बालकाचा मृत्यू

स्वीमिंग पूलमध्ये पडून बालकाचा मृत्यू

googlenewsNext

- लोकमत न्यूज नेटवर्क

पनवेल : खारघर सेक्टर ३५मधील हाइड पार्क इमारतीच्या आवारातील स्वीमिंग पूलमध्ये पडून पाच वर्षीय मुलाचा जीव गेल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. मनबीरसिंग बनवायत असे मुलाचे नाव असून, खारघर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
मनबीरसिंग हा खारघर सेक्टर ३५मधील गोकूळधाम इमारतीत आई आणि आजोबांसह राहत होता. गोकूळधाम सोसायटीच्या शेजारी असलेल्या हाइड पार्क या इमारतीत सिंग कुटुंबीयांचे नातेवाईक राहतात. रविवारी सायंकाळी आईसह मनबीरसिंग हाइड पार्कमध्ये गेला होता. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास मनबीरची आई इमारतीच्या गार्डनमध्ये बसली होती तेव्हा तो खेळत होता. खेळता-खेळता मनबीर इमारतीच्या आवारात स्वीमिंग पूलमध्ये पडला. त्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला.
मनबीर दिसेनासा झाल्याने त्याच्या आईने शोधाशोध केली असता, तो स्वीमिंग पूलमध्ये आढळून आला. त्याला तत्काळ खारघरमधील खासगी रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. खारघर पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.

सोसायटीचे दुर्लक्ष
मनबीरचा ज्या स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला, तो पूल गेल्या वर्षभरापासून बंद आहे. हाइड पार्क सोसायटीने पूल बंदिस्त न करता, फक्त ‘पूल वापरण्यात येऊ नये’ असा सूचना फलक लावला होता. लहानग्या मनबीरला ते न समजल्याने खेळता-खेळता तो पूलमध्ये पडला.

Web Title: Child's death by falling into the swimming pool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.