लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: श्रावण महिना सुरू झाल्यापासून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढली आहे. बुधवारी ३,५५७ टन भाजीपाल्याची आवक झाली. त्यामुळे फरसबी, शेवगा शेंग, टोमॅटोचे दर घसरले आहेत. वाटाणा, कारली, तोंडलीसह पालेभाज्यांचे दर मात्र वाढत आहेत.
बुधवारी ३,५५७ टन भाजीपाल्याची आवक झाली आहे. यामध्ये ५ लाख २६ हजार जुडी पालेभाज्यांचा समावेश आहे. विविध भागांतून ७१६ वाहने मार्केटमध्ये दाखल झाली आहेत. फरसबीचे दर प्रतिकिलो ५० ते ९० वरून ३४ ते ४० रुपयांवर आले आहेत. ढोबळी मिरचीचे दर ३० ते ५० वरून २४ ते ३० रुपयांवर आले आहेत. दुधी भोपळा, फ्लॉवर, घेवडा, शेवगा शेंग, टोमॅटोचे दर कमी झाले आहेत. आवक वाढूनही अनेक वस्तूंचे दर तेजीत आहेत. भेंडी, दोडका, तोंडलीचे दर वाढले आहेत. वाटाण्याचे दर एक आठवड्यात प्रतिकिलो ६० ते ८० वरून १०० ते १२० वर पोहोचले आहेत.
पालेभाज्यांचे प्रतिजुडी दरवस्तू ७ ऑगस्ट १४ ऑगस्ट
- काेथिंबीर ९ ते ११ १० ते १२
- मेथी ९ ते १० १५ ते २०
- पालक ९ ते ११ १५ ते १६
- पुदिना ८ ते ९ १० ते १२
- शेपू १० ते १२ ८ ते १०
कारले झाले कडू
आवक वाढल्यानंतरही कारल्याच्या दरामध्ये वाढ होत आहे. गत आठवड्यात कारली दर २० ते ३० रुपयांवरून ४० ते ४८ रुपयांवर गेले आहेत. एक आठवड्यात दर दुप्पट झाले असल्यामुळे श्रावणातही कारले ग्राहकांसाठी कडू झाले आहे.
भाजीपाल्याचे एक आठवड्यातील दर
वस्तू ७ ऑगस्ट १४ ऑगस्ट
- भेंडी २० ते ५५ ३४ ते ५८
- दुधी २० ते २८ १६ ते २६
- फरसबी ५० ते ९० ३४ ते ४०
- फ्लॉवर १५ ते २५ १६ ते २०
- गाजर १८ ते २८ २२ ते २८
- गवार ६० ते ८० ६० ते ७०
- घेवडा ४० ते ७० ५० ते ५६
- काकडी १२ ते २५ १६ ते २४
- कारली २० ते ३० ४० ते ४८
- कोबी १२ ते १८ १६ ते २२
- ढोबळी ३० ते ५० २४ ते ३०
- शेवगा ६० ते ९० ३५ ते ४५
- दोडका २४ ते ३४ २६ ते ३६
- टोमॅटो १५ ते ४० १४ ते २५
- तोंडली २२ ते ३४ ३५ ते ७०
- वाटाणा ६० ते ८० १०० ते १२०
- मिरची ३० ते ६० ३४ ते ६०