खोपोलीत स्वीकृत सदस्यांची निवड
By admin | Published: January 12, 2017 06:12 AM2017-01-12T06:12:47+5:302017-01-12T06:12:47+5:30
नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीच्या सभेत नाट्यमय घडामोडीनंतर, राष्ट्रवादीचे नितीन मोरे, शेकापचे निजामुद्दीन
खोपोली : नगरपरिषदेच्या स्वीकृत सदस्य निवडीच्या सभेत नाट्यमय घडामोडीनंतर, राष्ट्रवादीचे नितीन मोरे, शेकापचे निजामुद्दीन जळगावकर व शिवसेनेचे अमोल जाधव यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सुमन औरसमल यांनी जाहीर केले.
खोपोली नगरपरिषदेत शिवसेना १०, भाजपा ३ व काँग्रेस ३, असा १५ नगरसेवकांचा एक गट अस्तित्वात आला आहे. तर राष्ट्रवादी १०, शेकाप ३, अपक्ष १ व नगराध्यक्ष धरून १५ जणांचा दुसरा गट कार्यरत आहे. स्वीकृत नगरसेवकपदाच्या निवडीच्या वेळी सेनेचे गटनेते सुनील पाटील यांनी अमोल जाधव शिवसेना व चंद्रभागा अनिवार भाजपा अशी दोन नावे दिली, तर राष्ट्रवादी गटाकडून नितीन मोरे राष्ट्रवादी व निजामुद्दीन शेकाप अशी नावे देण्यात आली. दोन्ही गटाकडून प्रत्येकी एक सदस्य निवडून आल्यानंतर तिसऱ्या पदासाठी चिठ्ठी टाक ली जाईल, अशी अपेक्षा असताना, सुमन औरसमल यांनी भाजपाच्या मानसी काळोखे यांनी आपण सेना-भाजपा-काँग्रेसच्या गटाच्या सदस्य नसल्याचे कळविल्यामुळे, त्या गटाचे संख्याबळ कमी होत असल्याचे कारण देऊन राष्ट्रवादी गटाचे दोन्ही सदस्य नितीन मोरे व निजामुद्दीन जळगावकर यांची व सेनेच्या अमोल जाधव यांची निवड झाल्याचे जाहीर केले. (वार्ताहर)