उपनगराध्यक्षपदी चौधरी बिनविरोध
By admin | Published: January 3, 2017 05:50 AM2017-01-03T05:50:39+5:302017-01-03T05:50:39+5:30
नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे आकाश चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. २ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात निवडणूक
माथेरान : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे आकाश चौधरी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. २ जानेवारी रोजी नगरपरिषदेच्या सभागृहात निवडणूक प्रांत अधिकारी दत्ता भडकवाड यांच्याकडे उपनगराध्यक्षपदासाठी आकाश चौधरी यांचे एकमेव नामांकन सादर झाले. या नामांकनाची छाननी करून पीठासन अधिकारी तथा नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांच्याकडे सुपूर्द केल्यावर प्रेरणा सावंत यांनी आकाश चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. याचवेळी दोन स्वीकृत पदांसाठी सुद्धा चंद्रकांत जाधव आणि ऋ तुजा प्रधान यांचे नामांकन सादर झाले होते. त्यांची स्वीकृत सदस्य पदांसाठी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
यावेळी शिवसेना सत्ताधारी गटाचे गटनेते प्रसाद सावंत, नगरसेवक, नगरसेविका तसेच विरोधी पक्षाचे नगरसेवक शिवाजी शिंदे, नगरसेविका नजमा शारवान, वर्षा रॉड्रिक्स उपस्थित होते. आम्ही सत्ताधारी गटाच्या प्रत्येक सकारात्मक कार्यासाठी नेहमीच सहकार्याची भूमिका घेऊ आणि गावाच्या विकासाला हातभार लावू असे विरोधी पक्षाचे विद्यमान नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी स्पष्ट केले, तर माथेरानचा विकास मार्गी लावून, सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना निश्चितपणे न्याय देण्याचा प्रयत्न करू, असे गटनेते प्रसाद सावंत यांनी सूचित केले. यावेळी सर्वच नवोदित सदस्यांचा सत्कार झाला. यावेळी शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी, आर. पी. आय. अध्यक्ष अनिल गायकवाड आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
उरण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष जयेंद्र कोळी
1उरण : नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष आणि दोन स्वीकृत सदस्यांची निवड सोमवारी झाली. उरण नगरपरिषदेत नगराध्यक्षांसह निवडून आलेल्या १३ सदस्यांपैकी भाजपाचे जयेंद्र कोळी यांची उपनगराध्यक्षपदी तर स्वीकृत सदस्यपदी भाजपाचेच शहर अध्यक्ष कौशिक शहा आणि माजी नगरसेवक तुषार ठाकूर यांची निवड झाल्याची घोषणा पीठासन अधिकारी नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी केली. भाजपाच्या गटनेतेपदी माजी नगराध्यक्ष रवी भोईर यांच्या निवडीचीही घोषणा केली. 2भाजपा नेते रामशेठ ठाकूर, आ. प्रशांत ठाकूर, जेएनपीटी ट्रस्टी तथा माजी नगराध्यक्ष महेश बालदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्वबळावर निवडणुकी लढवित नगराध्यक्षांसह १७ पैकी १३ सदस्य निवडून आणून एकहाती सत्ता काबीज केली आहे. सोमवारी उपनगराध्यक्ष, गटनेता आणि दोन स्वीकृत सदस्य निवडीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. निवडीचे अधिकार जनतेतून निवडून आलेल्या नगराध्यक्षांना देण्यात आले होते. 3उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकमेव अर्ज दाखल झालेल्या जयेंद्र कोळी यांची बिनविरोध निवडीची घोषणा नगराध्यक्षा सायली म्हात्रे यांनी केली. त्यानंतर गटनेतेपदी भाजपाचे रवी भोईर यांची निवड झाली. स्वीकृत दोन नगरसेवकपदी भाजपाचे दोन तर सेनेकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. चारही उमेदवारी अर्ज वैध ठरविताना स्वीकृत सदस्यपदी भाजपाचेच शहर अध्यक्ष कौशिक शहा आणि माजी नगरसेवक तुषार ठाकूर यांच्या निवडीची घोषणा नगराध्यक्षांनी केली.
पेणच्या उपनगराध्यक्षपदी दीपक गुरव
पेण : नगरपरिषदेच्या उपाध्यक्ष पदांच्या सोमवारी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार दीपक गुरव यांनी नगर विकास आघाडीच्या प्रतिभा जाधव यांचा १२ विरूध्द १० अशा दोन मतांची पराभव के ला. पेण नगरपरिषदेच्या सभागृहात नगराध्यक्षा तथा पीठासीन अधिकारी म्हणून प्रीतम पाटील व मुख्यअधिकारी जीवन पाटील यांनी सर्वसाधारण सभा बोलावली होती.या सभेत उपाध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत बोट उंचावून मतदान केले. नगर विकास आघाडीच्या १० सदस्यांनी प्रतिभा जाधव यांना मतदान के ले.तर गुरव यांना ११ अधिक नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांचे सदस्य म्हणून एक मत अशा प्रकारे १२ मते प्राप्त होवून त्यांना विजय मिळाला. त्यामुळे दीपक गुरव यांची उपनगराध्यपदी निवड जाहीर के ली.निवड जाहीर होताच नगराध्यक्षा प्रीतम पाटील, अनिरूध्द पाटील, वैकुंठ पाटील या युवा काँग्रेस नेत्यांनी दीपक गुरव यांचे अभिनंदन केले. आघाडीचे निवृत्ती पाटील व वसुधा पाटील यांनीही उपाध्यक्षाचे अभिनंदन केले. यानंतर स्वीकृतपदांसाठी नगराध्यक्ष
प्रीतम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूकघेण्यात आली. पेण नगरपरिषदेच्या स्वीकृ त सदस्यांच्या निवड प्रक्रियेत १० सदस्यांच्या संख्येनुसार काँग्रेस पक्षाला व आघाडीचा एक या प्रमाणे दोन स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. त्यामध्ये आघाडीचे समीर सुभाष म्हात्रे तर कॉंग्रेसचे कुणाल विलास नाईक यांच्या निवडीची घोषणा नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केली.