सिडकोचा अतिरिक्त पदभार भूषण गगराणींकडे
By admin | Published: April 14, 2016 01:28 AM2016-04-14T01:28:58+5:302016-04-14T01:28:58+5:30
संजय भाटीया यांची सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी यांची नियुक्ती
नवी मुंबई : संजय भाटीया यांची सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरून बदली झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण गगरानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गगरानी यांच्याकडे सध्या सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. त्यानुसार बुधवारी त्यांनी सिडकोच्या या अतिरिक्त पदाचा पदभार स्वीकारला.
भाटीया यांना केंद्र शासनाने मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदावर प्रतिनियुक्तीवर पाठविले आहे. त्यानुसार त्यांनी बुधवारी आपला सिडकोतील पदभार सोडून मुंबई पोर्ट ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा अधिकृत पदभार स्वीकारला. त्यामुळे रिक्त झालेल्या सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदावर १९९0च्या बॅचचे भूषण गगरानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गगरानी हे सध्या एमआयडीसीत कार्यरत असल्याने तिकडून कार्यमुक्त होईपर्यंत त्यांच्यावर सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची अतिरिक्त जबाबदारी असणार आहे.