सिडको भवनची सुरक्षा ऐरणीवर, मुख्यालयातच घरफोडी, सुरक्षा भेदून दुसऱ्यांदा चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 03:07 AM2018-03-22T03:07:12+5:302018-03-22T03:07:12+5:30

सीबीडीमधील सिडको भवनमध्ये मंगळवारी रात्री घरफोडी झाली आहे. पोलीस आयुक्तालय व कोकण परिक्षेत्राच्या महासंचालकांच्या कार्यालयासमोर झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दोन वर्षांमध्ये दुसºयांदा चोरीची घटना घडली असून सिडको भवनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

 CIDCO building security on the anvil, burglary in headquarters, securing security, second time theft | सिडको भवनची सुरक्षा ऐरणीवर, मुख्यालयातच घरफोडी, सुरक्षा भेदून दुसऱ्यांदा चोरी

सिडको भवनची सुरक्षा ऐरणीवर, मुख्यालयातच घरफोडी, सुरक्षा भेदून दुसऱ्यांदा चोरी

Next

नवी मुंबई : सीबीडीमधील सिडको भवनमध्ये मंगळवारी रात्री घरफोडी झाली आहे. पोलीस आयुक्तालय व कोकण परिक्षेत्राच्या महासंचालकांच्या कार्यालयासमोर झालेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दोन वर्षांमध्ये दुसºयांदा चोरीची घटना घडली असून सिडको भवनच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत महामंडळ म्हणून सिडकोची ओळख आहे. विमानतळासह अनेक भव्य प्रकल्प उभारणाºया सिडकोने दक्षिण नवी मुंबई परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी तब्बल १०९ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. विकसित केलेल्या शहराची सुरक्षा करण्यासाठी भव्य योजना जाहीर करणाºया सिडकोला स्वत:च्या मुख्यालयाची सुरक्षा करण्यात अपयश येवू लागले आहे. सिडको भवनच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक बोर्ड व स्वत:चे सुरक्षा कर्मचारी आहेत. कार्यालयामध्ये येणाºया-जाणाºया प्रत्येकाची कसून चौकशी केली जाते. रात्रीही बंदोबस्तासाठी सुरक्षारक्षक तैनात असतात. परंतु ही सर्व सुरक्षा व्यवस्था भेदून चोरट्यांनी मंगळवारी रात्री पाचव्या मजल्यावरील लेखा शाखेत घरफोडी करण्याचा प्रयत्न केला. याठिकाणी रोख रक्कम सापडली नाही, परंतु चोरट्यांनी कागदपत्रे हलवली होती. सकाळी कर्मचारी आल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. याविषयी तत्काळ सीबीडी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी घरफोडीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. सिडको भवनच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यासाठी बांबूंची परांची लावण्यात आली आहे. या परांचीवरून चोरटे आतमध्ये आले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सिडको भवनमध्ये घरफोडीचा प्रयत्न झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. चोरटे पाचव्या मजल्यावर पोहचलेच कसे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लेखा शाखेतील कागदपत्रे हलविण्यात आली होती. महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली असती किंवा फाईल गहाळ झाल्या असत्या तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. चोरटे बरोबर पाचव्या मजल्यावरच कसे पोहचले असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. या प्रकरणी सिडकोमधील व परिसरातील सीसीटीव्ही पाहून गुन्ह्याचा तपास केला जात आहे. सिडको भवनमध्ये २४ तास सुरक्षारक्षक असताना चोरटे आतमध्ये गेलेच कसे असा प्रश्नही उपस्थित केला जात असून या प्रकरणाची कसून
चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title:  CIDCO building security on the anvil, burglary in headquarters, securing security, second time theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको