कळंबोली : आपला परिसर स्वच्छ असावा, असे प्रत्येकाला वाटते. त्यासाठी जागृती नागरिक कायम सतर्क असतात. परिसरातील अस्वच्छता, दुर्गंधीबाबत वारंवार तक्रारी करतात, त्याचा पाठपुरावाही करतात. मात्र, आता नागरिकांना घरबसल्या याबाबत तक्रारी करता येणार आहे. पनवेल महापालिकेबरोबरच सिडकोनेही स्वच्छता अॅप्स उपलब्ध करून दिला आहे. अॅप्सच्या माहितीसाठी सार्वजनिक ठिकाणी माहिती फलक लावण्यात आले आहेत. सिडको वसाहतीत स्वच्छतेबाबत कोणत्याही तक्रारी असतील, तर फोटो डाउनलोड करून लोेकेशन पाठवले, तर त्वरित तक्र ारीचे निवारण आरोग्य विभागाकडून करण्यात येणार आहे. स्वच्छ भारत अभियान सिडको वसाहतीत राबविण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. या नोडचा पनवेल महापालिकेत समावेश करण्यात आला आहे; परंतु अद्यापही हस्तांतरण झाले नाही. त्याशिवाय महापालिकेकडे व्यवस्था नसल्याने त्यांच्याकडे घनकचरा व्यवस्थापन लगेच हस्तांतरण होईल, याची शक्यता कमी आहे. त्यामुळे सिडकोच्या आरोग्य विभागालाच हे काम पाहावे लागणार आहे. नागरिकांना मोबाइलमध्ये हा अॅप्स डाउनलोड करून घ्यावा लागणार आहे. त्यावर कचऱ्याचा, समस्येचा फोटो ठिकाण नमूद करून अपलोड करता येईल. ही तक्र ार थेट स्वच्छता निरीक्षक व जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्यांवर आहे.पनवेल महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांकरिता स्वच्छता अॅप्स सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये येणाऱ्या तक्र ारींचे त्वरित निवारण करण्यात येईल. सद्या आमच्याकडे असलेल्या विभागात आलेल्या तक्र ारी आम्ही त्वरित निकाली काढू. - डॉ. बी. एस. बावस्करमुख्य आरोग्य अधिकारी, सिडकोतक्र ारींचीही दखलच्सिडको वसाहतींचा पनवेल महापालिकेत समावेश करण्यात आला असला तरी अद्याप हस्तांतरण झालेले नाही. त्यामुळे येथील रहिवासीही अॅप्सवर तक्र ार करू शकतात. ती तक्र ार सिडकोच्या आरोग्य विभागाकडे मनपाकडून पाठवली जाईल. तसेच याबाबत पाठपुरावाही करण्यात येणार आहे.या तक्र ारी कराच्कचऱ्याची गाडी आली नाहीच्सार्वजनिक शौचालयात पाणी नाहीच्मृत पशूच्रस्ते स्वच्छतेचा अभावच्सार्वजनिक स्वच्छतागृहांतील अस्वच्छता च्कचराकुंडी ओव्हरफ्लो
सिडकोचाही स्वच्छता अॅप्स
By admin | Published: January 11, 2017 6:28 AM