- अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीतील ज्या सिडको कॉलनी आहेत. त्या ठिकाणी २६८ कोटी रुपये खर्च करून सिडकोकडून विकास केला जाणार आहे. त्याकरिता निविदा प्रक्रि या पूर्ण होऊन कामाला सुरुवात करण्यात आली आहे. रस्ते, फुटपाथ, पावसाळी गटारांची कामे केली जाणार आहेत, त्यामुळे नवीन वर्षात गैरसोयी कमी होण्यास मदत होणार असल्याचे मत सिडकोकडून व्यक्त करण्यात आले आहे.कळंबोली आणि नवीन पनवेल या दोन कॉलनी जुन्या आहेत. त्या ठिकाणी सिडकोने बांधलेले घरे आहेत. तसेच ३० वर्षांपूर्वी रस्ते, फुटपाथ आणि पावसाळी गटारे बांधण्यात आली आहेत. त्यांची काही ठिकाणी दुरवस्था असल्याकारणाने नागरिकांना त्रास होत होता. यंदा पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रस्त्यांमध्ये खड्डे पडले. पावसाळी नाल्यांमध्ये माती तसेच कचरा जाऊन बसल्याने पाण्याचा निचरा होत नसल्याचे दिसू लागले. फुटपाथही चालायला काही सेक्टरमध्ये राहिलेले नाहीत. कामोठे व नवीन पनवेल काही ठिकाणी हीच समस्या दिसू लागली आहे. याबाबत कळंबोली विकास समिती, सिटीझन युनिटी फोरम व एकता सामाजिक संस्था कामोठे, रोडपालीच्या राजा गणेशोत्सव मंडळाबरोबरच लोकप्रतिनिधी त्याचबरोबर राजकीय पक्षांनीही पाठपुरावा केला होता.आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सिडको अध्यक्षपदाच्या काळात या महत्त्वाच्या सुविधांचा विकास करण्याबाबत संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याप्रमाणे आराखडा तयार करण्यात आला. त्यांना वरिष्ठ पातळीवरून मंजुरीही दिली गेली. कळंबोली, कामोठेकरिता अधीक्षक अभियंता सीताराम रोकडे यांनी सर्व्हे करून विविध विकासकामांना चालना गेल्या वर्षभरात दिली. त्यामुळे लगबग २७५ कोंटींच्या कामांना मंजुरी मिळून कामाला सुरुवात झाली आहे. या कॉलनीमध्ये मोकळ्या भूखंडाला सरंक्षण कुंपण, उद्यानामधील वेगवेगळ्या दुरुस्ती केली जाणार आहेत.नवीन पनवेलला जोरदार कामे सुरूनवीन पनवेल कॉलनीमध्ये फुटपाथ आणि रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम जोरदारपणे सुरू आहे. पावसाळी गटारे नवीन करण्यात येत आहेत, तसेच फुटपाथही नवे करण्यास काम हाती सिडकोने घेतले आहे.च्अभ्युदय बँक ते एचडीएफसी बँक परिसरात कामे सुरू आहेत. लवकरच ते पूर्ण होतील त्यामुळे नवीन पनवेलचे रूप बदलणार असल्याचे माजी नगराध्यक्ष संदीप पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले. खांदा कॉलनीतील रस्त्यांच्या व इतर कामांना सुरुवात होणार असल्याचे सभापती संजय भोपी म्हणाले.पडघे ते सीईटीपी रोडचे काम होणारफुटलॅण्ड - पडघे ब्रिजपासून तळोजा सीईटीपीकडे जाणाऱ्या रोडची दुरवस्था झालेली आहे. तो रस्ता १५ कोटी रुपये खर्च करून नव्याने बांधणी केली जाणार आहे. त्याकरिता निविदा प्रक्रि या अंतिम टप्प्यात आहेत. नवीन वर्षात या महत्त्वाच्या व गर्दीच्या रोडच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे.प्रक्रि या झालेल्या सांडपाण्याचा वापर होणारसिडको कॉलनीमधील सीईटीपी केंद्रांमध्ये सांडपाण्यावर प्रक्रि या केली जाते, ते खाडीला सोडून दिले जाते. त्याचा पुनर्वापर करण्यासाठी सिडकोने पाऊल उचलले आहे, याकरिता स्वतंत्र पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. हे पाणी तळोजा एमआयडीसीला दिले जाणार आहे. १५० कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. नवीन वर्षात या कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे सिडकोकडून सांगण्यात आले.नावडे, तळोजात कोट्यवधींची कामेनावडे, तळोजा या नवीन कॉलनीमध्ये कोट्यवधी रुपयांची विकासकामे सिडकोने सुरू केली आहेत. काही कामांना मंजुरी मिळाली आहे. या भागात रस्ते, गटारे, फुटपाथ करण्यात आलेला आहे. आता पम्पिंग हाउस तसेच नावडे येथे सहा कोटी रुपये खर्च करून होल्डिंग पॉण्ड बांधला जाणार आहे.सिडको वसाहतीत अनेक विकासकामे सिडकोने हाती घेतलेली आहेत. काही सुरू झाली आहेत तर काही काही दिवसांतच सुरू होतील, यामुळे नागरिकांना सोयसुविधा मिळणार आहेत. याकरिता मोठ्या प्रमाणात निधी मंजूर झाला आहे. लवकरात लवकरच सर्व काम पूर्ण करून ते लोकार्पण केली जातील.- सीताराम रोकडे,अधीक्षक अभियंता, सिडकोसिडको कॉलनी विकासकाम (कोटींमध्ये)नवीन पनवेल ४०कळंबोली १७२कामोठे १०तळोजा २८नावडे १८एकूण २६८
सिडको कॉलनींना मिळणार नवी झळाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2020 11:11 PM