प्रकल्पग्रस्तांसाठी सुट्टीच्या दिवशीही सिडको सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 06:07 AM2018-04-28T06:07:18+5:302018-04-28T06:07:18+5:30
प्रकल्पबाधितांना पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेअंतर्गत मुदतनिहाय भत्ता देण्याची योजना सिडकोने जाहीर केली आहे.
पनवेल : विमानतळ प्रकल्पबाधितांच्या स्थलांतरणाचे प्रोत्साहन भत्त्यानुसार अर्ज स्वीकारण्यासाठी २८ ते ३० एप्रिलला सुट्टीच्या दिवशीही सिडको कार्यालय सुरू ठेवले जाणार आहे. प्रकल्पग्रस्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रकल्पबाधितांना पुनर्वसन व पुन:स्थापना योजनेअंतर्गत मुदतनिहाय भत्ता देण्याची योजना सिडकोने जाहीर केली आहे. सिडकोने या योजनेसाठी तीन टप्प्यात वर्गीकरण केले आहे. ३० एप्रिलपर्यंत अर्ज सादर करणाऱ्यांना प्रतिचौरस फूट ३०० रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. ३१ मेपर्यंत अर्ज सादर करणाºयांना १०० रुपये एवढा भत्ता देण्यात येणार आहे. १ जून नंतर प्रोत्साहन भत्ता योजना संपुष्टात येणार आहे. या तारखेनंतर निष्कासित होणाºया बांधकामांसाठी पूर्वीच्या धोरणानुसार केवळ बांधकाम अनुदानाची रक्कम देण्यात येणार आहे. ३० एप्रिलपर्यंत अर्ज सादर करणाºया प्रकल्पग्रस्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी २८पासून पुढील तीन दिवस सुट्टीदिवशी सिडको कार्यालय सुरू ठेवले जाणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.