शहरं
Join us  
Trending Stories
1
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
2
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
3
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
4
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
5
Vinod Tawde: तावडे आलेल्या त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
6
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
7
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
8
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
11
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
12
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
13
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
14
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
15
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
16
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
17
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

सिडकोचा कंत्राटी कामगारांवर अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2016 2:11 AM

सिडकोमध्ये विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने मागील ३ ते ४ वर्षांपासून काम करीत असलेल्या कामगारांना किमान वेतन कायदा व इतर लागू शासकीय भत्त्त्यानुसार वेतन

वैभव गायकर, पनवेलसिडकोमध्ये विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने मागील ३ ते ४ वर्षांपासून काम करीत असलेल्या कामगारांना किमान वेतन कायदा व इतर लागू शासकीय भत्त्त्यानुसार वेतन देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अथर्व फॅसिलिटी सोल्युशन या एजन्सीमार्फत सिडको महामंडळात विविध पदांवर एकूण ३२६ कामगार कार्यरत आहेत. समाजसेवक प्रभाकर जोशी यांनी याकरिता पुढाकार घेतला असून, यासंदर्भात सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालक व्ही. राधा यांना पत्र लिहून कामगारांना न्याय देण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात १९ मे २०१५ रोजीच्या बोर्ड ठरावामध्ये किमान वेतन कायदा व इतर सर्व लागू भत्ते व कॉन्ट्रक्ट प्रॉफिट देण्याचा उल्लेख केला आहे. मात्र एजन्सीच्या कामगारांना अद्याप कोणत्याही प्रकारच्या सुविधा देण्यात आल्या नसल्याने कामगारदेखील आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. अथर्व फॅसिलिटी सोल्युशन या एजन्सीमार्फत कंत्राटी कामगारांमध्ये फायरमन १६, अभियंता ३६, सर्व्हेअर १०, स्टेनो ४, लिपिक ३८ , सीओ ९८ , सीटी ८०, ड्रायव्हर ३७, लॉ असिस्ट ७ आदी कामगार कार्यरत आहेत. वारंवार मागणी करूनदेखील अद्याप याबाबत कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याने कामगारांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याची माहिती प्रभाकर जोशी यांनी दिली. शासनाने तशा प्रकारचा ठराव करून सिडको त्याची अंमलबाजवणी करीत नाही, हा कामगारांवरील अन्याय आहे. यासंदर्भात वारंवार पाठपुरावा, पत्रव्यवहार करूनही सिडकोने दखल घेतली नसल्याने प्रशांत ठाकूर यांच्याकडे देखील पाठविले असल्याचे जोशी यांनी सांगितले .