CIDCO Lottery : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या २०३० घरांच्या सोडतीची घोषणा काही दिवसांपूर्वीच करण्यात आली. चार गटात उत्पन्न असणाऱ्यांसा म्हाडा मुंबई मंडळाकडून लॉटरीची जाहिरात काढण्यात आली. त्यानंतर आता नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सिडकोकडूनहीनवी मुंबईत घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. लवकरच याची घोषणा होणार असून त्यामुळे अनेकांना नवी मुंबईत हक्काचे घर मिळणार आहे. वाहतुकीच्या सुविधा जवळपास असल्याने ही घरं महत्त्वाची ठरणार आहेत.
नवी मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी सिडकोने आनंदाची बातमी दिली आहे. सिडको महामंडळाकडून कृष्णजन्माष्टमीच्या मुहूर्तावर ९०२ घरांच्या योजनेला सुरुवात केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत नवी मुंबईतील कळंबोली, खारघर आणि घणसोली या विकसित भागांमध्ये ९०२ घरांचा समावेश असणार आहे. त्यामुळे कृष्णजन्माष्टमीच्या मुहूर्तावर म्हणजेच २७ ऑगस्ट २०२४ रोजी या योजनेची जाहिरात काढण्यात येणार आहे.
योजनेअंतर्गत कळंबोली, खारघर आणि घणसोली नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ३८ आणि सर्वसामान्य गटासाठी १७५ अशा एकूण २१३ सदनिका उपलब्ध असणार आहेत. तर खारघरमध्ये सिडकोच्या स्वप्नपूर्ती आणि वास्तुविहार सेलिब्रेशन संकुलातील ६८९ घरांचाही या योजनेमध्ये समावेश असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे या घरांपासून जवळच रेल्वे स्थानकं, रस्ते, मेट्रोसेवा अशा अनेक सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे सिडकोच्या या घरांसाठी इच्छुकांची संख्या अधिक असण्याची शक्यता आहे. यासोबत या गृहसंकुलापासून नवी मुंबई आंततराष्ट्रीय विमानतळ जवळ असल्यामुळं इथल्या भागात मोठ्या योजना येऊन बदल होण्याची शक्यता आहे.
सिडको गृहनिर्माण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र
मिळकत दाखल्याचे प्रमाणपत्रअधिवास प्रमाणपत्रआधार कार्डपॅन कार्डमतदार ओळखपत्र