नेरुळमधील बेकायदा इमारतीवर सिडकोची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 03:05 PM2018-04-19T15:05:48+5:302018-04-19T15:05:48+5:30
महापालिकेच्या मदतीनं इमारत जमीनदोस्त
नवी मुंबई: नेरुळ-करावे येथील एका निर्माणाधीन इमारतीवर सिडकोनं कारवाई केली. नवी मुंबई महापालिकेच्या सहकार्यानं ही एकमजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली. या कारवाईसाठी कडकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
करावे येथील सेक्टर 36 मध्ये देवजी पाटेल यांनी 171 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या भूखंडावर विनापरवाना बांधकाम सुरु केलं होतं. या बांधकामाला सिडकोनं नोटीसही बजावली होती. त्यानंतरही काम सुरुच ठेवल्यानं अखेर गुरुवारी दुपारी कडेकोट पोलीस बंदोबस्तात हे बांधकाम जमीनदोस्त करण्यात आलं. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम विभागाचे नियंत्रक गणेश झीने यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबवण्यात आली. दरम्यान शुक्रवारी ऐरोली आणि घणसोली विभागातील अतिक्रमणांवर कारवाई केली जाणार असल्याचं झीने यांनी सांगितलं.