द्रोणागिरीतील फुंडे गावात सिडकोचा हातोडा
By admin | Published: February 6, 2016 02:27 AM2016-02-06T02:27:47+5:302016-02-06T02:27:47+5:30
द्रोणागिरी नोडमध्ये फुंडे गावाजवळ उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर सिडकोने बुधवारी कारवाई केली. या मोहिमेत नव्याने बांधण्यात येत असलेल्या
चिरनेर : द्रोणागिरी नोडमध्ये फुंडे गावाजवळ उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर सिडकोने बुधवारी कारवाई केली. या मोहिमेत नव्याने बांधण्यात येत असलेल्या २४ मीटर रुंद रस्त्यावर ही बांधकामे करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
अनधिकृत बांधकामांमुळे पायाभूत सुविधांच्या विकासकामात अडथळा येत असल्याने ७ अनधिकृत बांधकामांविरु द्ध नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. पत्रा शेड, चाळी, व्यावसायिक दुकाने, कार पार्किंग शेड, म्हशींचा गोठा या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सिडकोच्या परवानगीशिवाय ही बांधकामे करण्यात आली होती. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे नियंत्रक एस. जे. गोसावी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे सहाय्यक नियंत्रक एस. आर. राठोड, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे सहाय्यक अधिकारी आर. एस. चव्हाण, एस. एस. कडव आणि इतर सहाय्यक अधिकारी वर्गाने नागरिकांच्या तीव्र विरोधामध्ये देखील सुरळीतपणे पार पाडली. न्हावा-शेवा पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश देवरे व ३१ पोलीस अधिकारीवर्ग यांच्या सहकार्यामुळे सदर अतिक्रमणाची कारवाई यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.