शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदावर आज दिल्लीत निर्णय; फडणवीसांना पसंती, मात्र समर्थकांना धक्कातंत्राची भीती
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आजचा दिवस लाभदायी, धनलाभ संभवतो!
3
जम्मू-काश्मिरच्या खोऱ्यात दहशतवाद्यांचा खात्मा होणार; NSG कमांडो कायमस्वरूपी तैनात करण्यास गृह मंत्रालयाची मंजुरी
4
VI नंबर १, सन्मान कॅपिटल २, इंडियन ऑईल ३... ही अशी कोणती लिस्ट, ज्यात कोणालाही नकोय नाव?
5
शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले?
6
कोण होणार मुख्यमंत्री? विनोद तावडेंनी घेतली अमित शाहांची भेट; 40 मिनिटं चर्चा
7
सत्ता भल्याभल्यांना मोहात पाडते, पण...; श्रीकांत शिंदेंची वडील एकनाथ शिंदेंबाबत भावुक पोस्ट
8
डिसेंबरमध्ये भाजपाच्या नवीन अध्यक्षांची निवड; निरीक्षकांच्या केल्या नेमणुका
9
शिंदे म्हणतात, ‘लढाई’ जिंकली, पण ‘युद्ध’ बाकी; २५ तारखेच्या दिल्लीतील बैठकीत काय घडलं?
10
मविआला पहिला धक्का?; मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची उद्धवसेनेची इच्छा
11
सोनिया, राहुल, प्रियांका - संसदेत तिहेरी तोफ; संसदीय इतिहासात पहिल्यांदाच एकत्र
12
डोंगरीत बहुमजली इमारतीला भीषण आग; पाच जखमी; ४० रहिवाशांची सुखरूप सुटका
13
कुजबुज: मोदी-शाहांचे आभार मात्र फडणवीसांचं नावही घेतलं नाही, शिंदेंची नाराजी का?
14
मुंबईतील दुर्दैवी घटना! डंपरच्या धडकेत मायलेकाचा मृत्यू; शाळेत जाताना काळाचा घाला
15
राज्याला भरली हुडहुडी! मुंबईसह उत्तर महाराष्ट्राला थंडीच्या लाटेचा इशारा
16
मानसिक छळाला कंटाळून एअर इंडियाच्या महिला पायलटनं उचललं टोकाचं पाऊल, मित्राला अटक
17
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर स्वबळाची भाषा सुरू; मविआ फुटीच्या उंबरठ्यावर?
18
महापालिका निवडणुकीत पक्षाचे अस्तित्व टिकवण्याचे उद्धव ठाकरेंसमोर कडवे आव्हान
19
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
20
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान

द्रोणागिरीतील फुंडे गावात सिडकोचा हातोडा

By admin | Published: February 06, 2016 2:27 AM

द्रोणागिरी नोडमध्ये फुंडे गावाजवळ उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर सिडकोने बुधवारी कारवाई केली. या मोहिमेत नव्याने बांधण्यात येत असलेल्या

चिरनेर : द्रोणागिरी नोडमध्ये फुंडे गावाजवळ उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर सिडकोने बुधवारी कारवाई केली. या मोहिमेत नव्याने बांधण्यात येत असलेल्या २४ मीटर रुंद रस्त्यावर ही बांधकामे करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अनधिकृत बांधकामांमुळे पायाभूत सुविधांच्या विकासकामात अडथळा येत असल्याने ७ अनधिकृत बांधकामांविरु द्ध नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. पत्रा शेड, चाळी, व्यावसायिक दुकाने, कार पार्किंग शेड, म्हशींचा गोठा या अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. सिडकोच्या परवानगीशिवाय ही बांधकामे करण्यात आली होती. सिडकोच्या अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे नियंत्रक एस. जे. गोसावी, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे सहाय्यक नियंत्रक एस. आर. राठोड, अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे सहाय्यक अधिकारी आर. एस. चव्हाण, एस. एस. कडव आणि इतर सहाय्यक अधिकारी वर्गाने नागरिकांच्या तीव्र विरोधामध्ये देखील सुरळीतपणे पार पाडली. न्हावा-शेवा पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश देवरे व ३१ पोलीस अधिकारीवर्ग यांच्या सहकार्यामुळे सदर अतिक्रमणाची कारवाई यशस्वीरीत्या पार पाडण्यात आली.