घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर, सिडकोकडून नवी मुंबईत 14,838 घरांसाठी लॉटरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2018 15:18 IST2018-08-11T13:57:51+5:302018-08-11T15:18:37+5:30
घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईच्या पाच नोडमध्ये उभारण्यात येत असलेल्या 14,838 घरांसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरु होणार आहे.

घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी खूशखबर, सिडकोकडून नवी मुंबईत 14,838 घरांसाठी लॉटरी
नवी मुंबई - घराचं स्वप्न पाहणाऱ्या मुंबईकरांसाठी एक खुशखबर आहे. सिडकोच्या माध्यमातून नवी मुंबईच्या पाच नोडमध्ये उभारण्यात येत असलेल्या 14,838 घरांसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी सुरु होणार आहे. ही सर्व घरे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत उभारली जाणार आहेत. या घरांच्या किमती 18 लाख ते 27 लाख रुपये दरम्यान असतील.
स्वातंत्र्यदिनी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या ऑनलाईन नोंदणी पोर्टलचे उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी पत्रकार परिषदेत दिली. घरांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 15 ऑगस्ट ते 17 सप्टेंबर 2018 पर्यंत असणार आहे. 2 ऑक्टोबर 2018 रोजी या घरांची संगणकीय सोडत काढली जाईल, असे चंद्र यांनी सांगितले. तसेच आणखी 25 हजार घरांचा आराखडा तयार करण्यात आला असून डिसेंबर 2018 मध्ये या घरांच्या बांधकामाला सुरुवात केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.