सिडको अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केले श्रमदान
By कमलाकर कांबळे | Published: October 1, 2023 06:48 PM2023-10-01T18:48:12+5:302023-10-01T18:48:26+5:30
देशात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा पाळला जात आहे.
कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई:सिडको अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रविवारी सिडकोभवन परिसरात स्वच्छता मोहिम राबवून श्रमदान केले. या अभियानात सिडकोच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी आणि कर्मचारी संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.
देशात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता पंधरवडा पाळला जात आहे. २ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती आहे. त्याअनुषंगाने १ ऑक्टोबर रोजी एक तास एक तारीख या उपक्रमांतर्गत विविध देशभरात स्वच्छता अभियान राबविण्याचे जाहिर करण्यात आले होते. त्यानुसार सिडकोत रविवारी सकाळी १० ते ११ असे एक तास स्वच्छता अभियान राबविण्यात आले. या अभियानात सिडकोचे मुख्य अभियंता धायटकर, व्यवस्थापक (कार्मिक), फैय्याज खान , मुख्य आरोग्य अधिकारी श्यामकांत बावस्कर, जनसंपर्क अधिकारी प्रिया रतांबे, मुख्य लेखा अधिकारी धनराज गरड, मुख्य नियोजनकार रविंद्र मानकर सिडको एम्प्लॉईजचे सरचिटणीस जे.टी. पाटील, उपाध्यक्ष संजय पाटील, इजिनियरिंग असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश ठाकूर आदीसह अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.